TRENDING:

Pune Weather : पुण्यात ढगाळ वातावरण, सातारा, सांगलीचं काय? पश्चिम महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज

Last Updated:
पुढील 24 तासात कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार सरींची शक्यता असल्याने, तसेच विदर्भात विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रासह उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
1/7
पुण्यात ढगाळ वातावरण, सांगलीचं काय? पश्चिम महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज
मॉन्सूनचे प्रवाह कमजोर झाल्याने राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. पुढील 24 तासात कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार सरींची शक्यता असल्याने, तसेच विदर्भात विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रासह उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यातील कमाल तापमानात अंशत घट होऊन 29 अंश सेल्सिअस नोंद झाली. पुढील 24 तासात पुण्यातील आकाश ढगाळ राहण्याचे संकेत आहेत. पुणे आणि पुण्याचा घाट परिसरात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहिल. यावेळी कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहिल.
advertisement
3/7
कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात ढगाळ वातावरण राहिले. यावेळी तापमान 30 अंश सेल्सिअस राहिले. पुढील 24 तासात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर देखील हलक्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस राहिल.
advertisement
4/7
सातारा जिह्यात शेतीच्या कामांना गती आली आहे. सध्या पावसाने उघडीत घेतली असली तरीही आकाश साधारणपणे ढगा राहत आहे. पुढील 24 तासात कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस राहिल. अंशतः ढगाळ आकाशासह तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून सांगण्यात आला आहे.
advertisement
5/7
सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसापूर्वी झालेल्या हळद लागणीस अवकाळी पोषक ठरला आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतीच्या कामांनी गती घेतली आहे. मागील 24 तास 31.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तसेच पुढील 24 तासात तूरळक ठिकाणी हलक्या पावसासह आकाश ढगाळ असेल.
advertisement
6/7
सोलापूर जिल्ह्यातील तापमानात वाढ होत असून मागील 24 तासात पारा 34.6 अंशावर पोहोचला. तसेच पुढील 24 तासात पारा 35 अंशावर स्थिर राहण्याचा अंदाज आहे. सोलापूर जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी ढगाळ आकाशासह रिमझिम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
7/7
उत्तर प्रदशापासून पूर्व विदर्भापर्यंत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. मॉन्सून कमजोर होताच राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात अंशतः ढगाळ हवामान असले तरिही उन्हाचा चटका आणि उकाडा पुन्हा वाढला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Weather : पुण्यात ढगाळ वातावरण, सातारा, सांगलीचं काय? पश्चिम महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल