TRENDING:

आधुनिक काळातील सावित्री, नवऱ्याला किडनी देत दिले जीवनदान, पती-पत्नीच्या प्रेमाची अनोखी गोष्ट!

Last Updated:
आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, सावित्रीनं आपल्या पतीचं म्हणजेच सत्यवानाचं प्राण यमदेवाकडून परत आणले आणि मग त्यानंतर वटसावित्रीचा सण साजरा केला जाऊ लागला. आपल्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य लाभो यासाठी जेष्ठ महिन्यातील पौर्णिमेचा दिवस हा वाटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. याचप्रमाणे पुणे जिल्यातील दौंड तालुक्यातील केडगाव येथे राहणारे शैला जगताप यांनी आपल्या नवऱ्याला किडनी देत पतीचे प्राण वाचवले आहे. आज जाणून घेऊयात, ही अनोखी कहाणी (प्राची केदारी/प्रतिनिधी, पुणे)
advertisement
1/5
आधुनिक काळातील सावित्री, नवऱ्याला किडनी देत दिले जीवनदान, पती-पत्नीच्या...
पंढरीनाथ जगताप ते 2017 पासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांनी अनेक ठिकाणी उपचार घेतले. त्यांच्या भावांनी देखील त्यांना वेळोवेळी दवाखान्यात नेले. परंतु तरीही त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. डायलेसिस करून त्यांना असह्य झालं होतं. त्यामुळे त्यांचे शरीरही साथ देत नव्हते.
advertisement
2/5
त्यावेळी त्यांना एका जवळच्या डॉक्टरांकडे नेण्यात आलं. तेव्हा डॉक्टरांनी किडनी बदल हा एकमेव पर्याय असल्याचे सांगितलं. तेव्हा त्यांच्या पत्नी शैला जगताप यांनी कशाचाही विचार न करता आपल्या पतीला किडनी देण्याचं ठरवलं.
advertisement
3/5
यानंतर त्यांनी रक्त गट तपासला असता दोघांचा एकच रक्त गट आला. मी माझ्या पतीला किडनी देऊन त्यांचा जीव वाचवणार असं म्हणतं त्यांनी ही किडनी ट्रान्स्प्लांटची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
4/5
यानंतर तामिळनाडू येथील कोईम्बतूर येथे ही शस्त्रक्रिया करण्यात आली व ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. पंढरीनाथ जगताप सांगतात की, आमचा किराणा मालाचा व्यवसाय आहे आणि आमची शस्त्रक्रिया करून तीन वर्ष होऊन गेले.
advertisement
5/5
आज आम्ही दोघेही छान असून कामही करतो. माझ्या पत्नीने दिलेल्या किडनीमुळे हे सर्व शक्य झालं. ती आज माझी सावित्री आहे, या शब्दात पंढरीनाथ जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
आधुनिक काळातील सावित्री, नवऱ्याला किडनी देत दिले जीवनदान, पती-पत्नीच्या प्रेमाची अनोखी गोष्ट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल