वर्षभर ज्या वेळेची वाट पाहिली ती आलीच! 15 ते 21 डिसेंबर दरम्यान या राशींकडे श्रीमंती येण्यास सुरुवात होणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : 2025 वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, डिसेंबरचा तिसरा आठवडा ग्रहबदल, संक्रमण आणि ऊर्जेतील मोठ्या उलथापालथीमुळे विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.
advertisement
1/6

2025 वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, डिसेंबरचा तिसरा आठवडा ग्रहबदल, संक्रमण आणि ऊर्जेतील मोठ्या उलथापालथीमुळे विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. या आठवड्यात गुरु, बुध आणि शुक्र या महत्त्वाच्या ग्रहांचे राशीपरिवर्तन होत आहे. त्यामुळे प्रेमसंबंध, करिअर, आर्थिक स्थिती आणि आरोग्य या सर्वच क्षेत्रांमध्ये मोठे बदल दिसून येतील. सिंह आणि कन्या राशींसाठी हा काळ काय संदेश देतो ते जाणून घ्या.
advertisement
2/6
सिंह राशी - सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भावनिक चढउतार घेऊन येत आहे. नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्याने संयम आणि संवाद आवश्यक आहे. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण बदल घडू शकतात. वरिष्ठांकडून नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. निर्णय घेताना घाई न करता सर्व बाजू विचारात घ्या. काही सिंह राशीतील लोकांना ऑफिस किंवा व्यवसायाच्या निमित्ताने अचानक प्रवास करावा लागू शकतो. तुमच्या नेतृत्वगुणांची परीक्षा होईल आणि योग्य वेळेत घेतलेले निर्णय करिअरला नवी दिशा देतील.
advertisement
3/6
आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र मोठ्या व्यवहारांसाठी योग्य व्यक्तींचा सल्ला घ्यावा. खर्चापेक्षा प्राप्ती अधिक राहील. आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशीच्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. थकवा, ताण आणि अनियमित दिनचर्या आरोग्यावर परिणाम करू शकते.
advertisement
4/6
कन्या राशी - कन्या राशीतील लोकांनी या आठवड्यात नातेसंबंधांमध्ये सावधानतेने वागण्याची गरज आहे. पार्टनरवर जास्त नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न न करता त्यांना स्पेस द्यावी. लहानसहान गोष्टींवरून वाद टाळा. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास नात्यातील ताण कमी होईल आणि विश्वास अधिक दृढ होईल.
advertisement
5/6
करिअरच्या दृष्टीने हा आठवडा प्रगतीकारक आहे. नवीन प्रोजेक्ट्स हातात येऊ शकतात. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. स्वतःच्या कामावर फोकस करा. व्यवसायिक कामकाजात सुधारणा होण्याची आणि उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र अचानक आलेल्या आपत्कालीन परिस्थितीत काही खर्च करावा लागू शकतो. त्यामुळे पैशाचे नियोजन करूनच पुढे जा. अनावश्यक खर्च टाळणे हितावह राहील.
advertisement
6/6
<strong>(सादर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)</strong>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
वर्षभर ज्या वेळेची वाट पाहिली ती आलीच! 15 ते 21 डिसेंबर दरम्यान या राशींकडे श्रीमंती येण्यास सुरुवात होणार