TRENDING:

29 मार्च गेमचेंजर! कोणत्या राशींना शनीचा आशीर्वाद मिळणार, कोणाच्या अडचणी वाढणार?

Last Updated:
29 मार्च हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा ठरला. याच दिवशी वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण लागलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तब्बल अडीच वर्षांनी शनीचं राशीपरिवर्तन झालं. कुंभ राशीतून बाहेर पडून शनीचा मीन राशीत प्रवेश झाला. आता शनीदेवांचा आशीर्वाद कोणाच्या पाठीशी असेल आणि कोणाच्या पाठीशी नसेल, जाणून घेऊया. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
advertisement
1/13
29 मार्च गेमचेंजर! कोणत्या राशींना शनीचा आशीर्वाद मिळणार, कोणाच्या अडचणी वाढणार?
मेष : ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, शनीच्या राशीपरिवर्तनाचा या राशीच्या व्यक्तींवर नकारात्मक प्रभाव पडेल. त्यासह साडेसाती सुरू होईल. परिणामी मानसिक त्रास वाढेल. आर्थिक चणचण भासेल. एकूणच काळ नुकसानाचा असेल.
advertisement
2/13
वृषभ : या राशीच्या व्यक्तींवर शनी राशीपरिवर्तनाचा सकारात्मक प्रभाव पडेल. उत्पन्न कमालीचं वाढेल. नवं काम सुरू करण्यासाठी उत्तम काळ असेल. घर किंवा गाडी खरेदीचा योग आहे.
advertisement
3/13
मिथुन : या राशीच्या व्यक्तींवर शनी राशीपरिवर्तनाचा सकारात्मक प्रभाव पडेल. शनीच्या आशीर्वादानं मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. करियरमध्ये प्रगती होईल. रखडलेली कामं मार्गी लागतील.
advertisement
4/13
कर्क : या राशीच्या व्यक्तींवर शनी राशीपरिवर्तनाचा सकारात्मक प्रभाव पडेल. आतापर्यंत सुरू असलेली शनी ढैय्या ओसरेल. भाग्याची पुरेपूर साथ मिळेल, त्यामुळे रखडलेली कामं मार्गी लागतील. कामकाजात फायदा होईल. सिंगल असाल तर लग्नासाठी मनासारखं स्थळ येईल. आर्थिक स्थिती कमालीची सुधारेल.
advertisement
5/13
सिंह : या राशीच्या व्यक्तींवर शनी राशीपरिवर्तनाचा नकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानसिक, शारीरिक त्रास होऊ शकतो. मनात विचित्र विचार येतील. चिडचिड होईल, परंतु शब्द जपून वापरावे, नाहीतर आपलंच नुकसान होण्याची शक्यता आहे.
advertisement
6/13
कन्या : या राशीच्या व्यक्तींवर शनी राशीपरिवर्तनाचा सकारात्मक प्रभाव पडेल. संसारात भरभरून सुख येईल. नोकरीत प्रमोशन होण्याची, पगारवाढीची शक्यता आहे.
advertisement
7/13
तूळ : या राशीच्या व्यक्तींना शनीचा आशीर्वाद मिळणार आहे. आपण आपल्या शत्रूंवर भारी पडाल. कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये निकाल आपल्या बाजूनं लागेल. वडिलोपार्जित संपत्तीबाबत जे काही वाद सुरू असतील ते आता मिटतील. करियरमध्ये प्रगती होईल.
advertisement
8/13
वृश्चिक : या राशीच्या व्यक्तींवर शनी राशीपरिवर्तनाचा सकारात्मक प्रभाव पडेल. शनी ढैय्या संपेल. नवरा-बायकोच्या नात्यात गोडवा वाढेल. जवळपास प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. चहूबाजूंनी पैशांचा जणू वर्षाव होईल.
advertisement
9/13
धनू : या राशीच्या व्यक्तींसाठी शनीचं राशीपरिवर्तन नकारात्मक ठरण्याची शक्यता आहे. शनी ढैय्यामुळे अडचणी वाढतील. मन अशांत राहिल. आपल्यामुळे आई-वडिलांना त्रास होऊ शकतो.
advertisement
10/13
मकर : या राशीच्या व्यक्तींवर शनीच्या राशीपरिवर्तनाचा सकारात्मक प्रभाव पडणार आहे. शनीची साडेसाती संपणार आहे. धनवर्षाव होईल, उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
11/13
कुंभ : या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ चढ-उताराचा असेल. साडेसातीचा प्रभाव असेल, मात्र तो अंतिम टप्प्यात असल्यानं जास्त त्रास होणार नाही. अधूनमधून अडचणींचा ओघ वाढेल, कधी ओसरेल. कामकाजात, करियरमध्ये प्रगती होईल.
advertisement
12/13
मीन : या राशीच्या व्यक्तींवर साडेसातीचा प्रभाव असेल. कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी गरजेपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. प्रेमात अडथळे येऊ शकतात. शब्द जपून वापरावे, वागण्यावरही नियंत्रण ठेवावं. वाहन जपून चालवावं, दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. कुटुंबातील नातेसंबंध बिघडू शकतात. देवघरमधील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी ही सविस्तर माहिती दिली आहे.
advertisement
13/13
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
29 मार्च गेमचेंजर! कोणत्या राशींना शनीचा आशीर्वाद मिळणार, कोणाच्या अडचणी वाढणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल