अक्षय्य तृतीया नेमकी कधी आहे, 10 की 11? या दिवशी पुण्य कमवण्याचा मार्ग एकच!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. सर्वबाजूंनी हा योग अत्यंत शुभ असतो. म्हणूनच अक्षय्य तृतीयेला केलेल्या पूजेचं विशेष फळ मिळतं, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. (रामकुमार नायक, प्रतिनिधी / रायपूर)
advertisement
1/5

अक्षय्य तृतीयेला विशेषतः देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते. त्यांच्या आशीर्वादाने सुख-समृद्धीने आपल्या घराची भरभराट होते. म्हणूनच लोक वर्षभर या सुवर्ण दिवसाची आतुरतेने वाट पाहतात. याबाबत छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमधील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित मनोज शुक्ला काय सांगतात जाणून घेऊया.
advertisement
2/5
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय्य तृतीयेला केलेलं कोणतंही काम 'अक्षय्य' मानलं जातं. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हा सण साजरा केला जातो. पौराणिक कथांनुसार, याच दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता. याच दिवशी भगवान विष्णूंनी भगवान परशुराम अवतार घेतला होता. म्हणूनच हा दिवस परशुराम अवतरण दिवस म्हणूनही साजरा केला जातो. शिवाय त्यामुळेच अक्षय्य तृतीयेला शुभ कार्य पार पाडतात, जास्तीत जास्त पुण्य आणि दान करण्याचा या दिवशी सर्वांचा प्रयत्न असतो.
advertisement
3/5
ज्योतिषांनी सांगितलं की, यंदा अक्षय्य तृतीया 10 मे रोजी साजरी होईल. आपण कायम सत्कर्म करच्याच प्रयत्न करतो, परंतु कधी-कधी आपल्या हातून नकळत वाईट कर्म घडून जातात. ज्याचा त्रास नंतर सहन करावा लागतो. अक्षय्य तृतीया हा दिवस ज्योतिषशास्त्रात अत्यंत विशेष असतो. त्यामुळे या दिवशी केलेल्या चांगल्या कामाचं आपल्याला जसं दुप्पट फळ मिळतं तसंच या दिवशी केलेल्या वाईट कामामुळे आपल्याला आयुष्यभर दु:खात दिवस काढावे लागतात.
advertisement
4/5
म्हणून <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/astrology-do-not-do-these-things-on-akshaya-tritiya-even-by-mistake-l18w-mhij-1175469.html">अक्षय्य तृतीये</a>ला आपल्या हातून कोणतंही वाईट काम घडणार नाही, याची काटेकोरपणे काळजी घ्या. दारात आलेल्या कोणत्याही भुकेलेल्या व्यक्तीला रिकाम्या हाती परत पाठवू नका. नाहीतर त्याचे परिणाम पुढे भोगावे लागतील. <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/this-year-there-is-no-shubh-muhurat-for-marriage-on-akshaya-tritiya-l18w-mhij-1175938.html">अक्षय्य तृतीये</a>ला दान करणं हेच सर्वात मोठं पुण्य मानलं जातं. शिवाय या दिवशी आवर्जून महादेवांना जल अर्पण करावं. लक्ष्मी-नारायणासह त्यांचीही मनोभावे पूजा करावी.
advertisement
5/5
(सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
अक्षय्य तृतीया नेमकी कधी आहे, 10 की 11? या दिवशी पुण्य कमवण्याचा मार्ग एकच!