TRENDING:

Astrology: दिवाळीनंतर या राशींना मिळणार झटका! शनिदेव वाढवणार अडचणी

Last Updated:
हिंदू पंचांगानुसार, ३१ ऑक्टोबरला संपूर्ण देशात दिवाळी हा सण साजरा केला जाणार आहे. त्यानंतर १५ दिवसांनी म्हणजेच १५ नोव्हेंबर २०२४ला शनि मार्गी होणार आहेत.
advertisement
1/7
Astrology: दिवाळीनंतर या राशींना मिळणार झटका! शनिदेव वाढवणार अडचणी
शनि देवाला न्यायाचे देवता म्हटले जाते. त्यांच्या नजरेतून कोणीही सुटू शकत नाही. असे म्हटले जाते की शनि देवाची कठोर नजर तुमच्यावर पडल्यास तुमच्या आयुष्यात कठीण काळ सुरू होतो.
advertisement
2/7
सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वांत मंद गतीने चालतो. याच कारणामुळे लोकांच्या मनात या ग्रहाबाबत भीती असते. मात्र दिवाळीनंतर काही लोकांची भीती वाढणार आहे.
advertisement
3/7
हिंदू पंचांगानुसार, ३१ ऑक्टोबरला संपूर्ण देशात दिवाळी हा सण साजरा केला जाणार आहे. त्यानंतर १५ दिवसांनी म्हणजेच १५ नोव्हेंबर २०२४ला शनि मार्गी होणार आहेत. शनि कुंभ राशीचे स्वामी असून सध्या ते याच राशीत भ्रमण करत आहेत. त्यामुळे ते याच घरात वक्रीतून मार्गी होणार आहेत. अशा स्थितीत कोणात्या राशींवर या संक्रमणाचा प्रभाव पडणार आहे जाणून घ्या.
advertisement
4/7
ज्योतिष शास्त्रात सांगण्यात आल्यानुसार, शनि देवाला न्यायाची देवता मानले गेले आहे. तसेच ते कठोर परिश्रमाचेही कारक आहेत. त्यामुळे ज्या लोकांना कठोर परिश्रम करूनही यश मिळत नाहीय त्यांनी आता टेन्शन सोडून द्यावे. कारण शनि मार्गी झाल्यानंतर त्यांचे चांगले दिवस सुरू होणार आहेत. मात्र अशाही काही राशी आहेत ज्यांना येत्या काळमध्ये काही समस्यांचा सामना करावा लागणार आहे.
advertisement
5/7
<strong>कुंभ :</strong> या राशीच्या लोकांसाठी शनिचे मार्गी होणे नुकसानदायक ठरणार आहे. शनिच्या नकारात्मक प्रभावामुळे या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये काही अडचणी येऊ शकतात. तर नोकरदार लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी समस्या येऊ शकतात. काहींना तर नोकरी मिळण्यातही अडचण येऊ शकते. व्यापारी वर्गालाही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
advertisement
6/7
<strong>मकर :</strong> शनिचे मार्गी होणे या राशीच्या लोकांसाठी चांगले नाही. त्यांचे वैवाहिक जीवन प्रभावित होऊ शकते. शनिच्या नकारात्मक प्रभावामुळे या लोकांचा राग आणि अहंकार वाढू शकतो. परिणामी याचा प्रभाव त्यांच्या वैवाहिक जीवनावर पडू शकतो. रागामुळे या लोकांचे नातेसंबंध खराब होतात. करिअरबद्दल बोलायचे झाले तर त्यांना त्यांच्या कामात काही व्यत्यय येऊ शकतो.
advertisement
7/7
<strong>मीन :</strong> शनिच्या मार्गी होण्याचा प्रभाव मीन राशीच्या लोकांच्या नातेसंबंध आणि करिअरवरही पडू शकतो. यावेळी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. इतकंच नाही तर त्यांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो. त्यांचा एखादा जुना आजार पुन्हा डोकं वर काढू शकतो. म्हणूनच शनिचे मार्गी होणे या राशीच्या लोकांसाठी खूपच नुकसानदायक सिद्ध होऊ शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Astrology: दिवाळीनंतर या राशींना मिळणार झटका! शनिदेव वाढवणार अडचणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल