Hanuman Jayanti 2024: मारुतीरायांना साकडं घालणं पुरेसं नाही, चुकूनही करू नका 'ही' 3 कामं
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
दरवर्षी चैत्र पौर्णिमा तिथीला हनुमान जयंती साजरी केली जाते. यंदा 23 एप्रिलला हा विशेष सण साजरा होईल. या दिवशी मारुतीरायांची विधीवत पूजा करून त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केले जातील. (अभिषेक जायसवाल, प्रतिनिधी / वाराणसी)
advertisement
1/5

काशीचे ज्योतिषी पंडित संजय उपाध्याय यांनी सांगितलं की, हनुमान जयंतीच्या दिवशी मारुतीरायांची केवळ विधीवत पूजा करणं पुरेसं नाहीये. भाविकांनी या दिवशी काही कामं चुकूनही करू नये.
advertisement
2/5
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, या दिवशी आपल्या मनात अजिबात वाईट विचार येऊ देऊ नये. मारुती ब्रह्मचारी होते, त्यामुळे या तिथीला ब्रह्मचार्य पाळावं.
advertisement
3/5
<a href="https://news18marathi.com/photogallery/religion/rare-coincidence-after-100-years-4-zodiac-signs-destiny-will-change-l18w-mhij-1166634.html">हनुमान जयंती</a>दिनी गरजू व्यक्तींना दान आवर्जून करावं. जी व्यक्ती गोरगरिबांची मदत करते, तिच्या पाठीशी मारुतीरायांचा आशीर्वाद सदैव राहतो, अशी मान्यता आहे. तसंच प्रभू श्रीरामांची पूजा केल्यानेही मारुतीराया प्रसन्न होतात.
advertisement
4/5
<a href="https://news18marathi.com/photogallery/religion/you-will-get-rid-of-all-your-problems-just-do-these-remedies-on-hanuman-jayanti-l18w-mhij-1168326.html">हनुमान जयंती</a>दिनी अजिबात खोटं बोलू नये. मांसाहार आणि नशेच्या पदार्थांचं सेवन करू नये. या दिवशी केस किंवा नखं कापू नये. अन्यथा कधीही न संपणारी साडेसाती पाठीशी लागते.
advertisement
5/5
(सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Hanuman Jayanti 2024: मारुतीरायांना साकडं घालणं पुरेसं नाही, चुकूनही करू नका 'ही' 3 कामं