TRENDING:

Tulsi Vivah 2024 : तुळशी विवाहाच्या दिवशी करा हे सोपे उपाय, आर्थिक फायदा होणार, सुटतील अनेक समस्या

Last Updated:
Tulsi Vivah 2024 : दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशीला तुळशी विवाह साजरा केला जातो. म्हणजे कार्तिकी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी हा तुळशी विवाह साजरा करतात. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वादशीला भगवान विष्णु आणि तुळशी मातेचे लग्न झाले होते. यानिमित्ताने तुळशी विवाहाचे आयोजन केले जाते. या वर्ष तुळशी विवाह 13 नोव्हेंबर साजरा केली जाईल. धार्मिक मान्यतेनुसार तुळशी विवाहाच्या दिवशी काही खास उपाय केल्यास तुमच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. (इशा/ ऋषिकेश, प्रतिनिधी)
advertisement
1/6
तुळशी विवाहाच्या दिवशी करा हे सोपे उपाय, आर्थिक फायदा होणार, सुटतील अनेक समस्या
उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील श्री सच्चा अखिलेश्वर महादेव मंदिराचे पुजारी शुभम तिवारी यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, हिंदू धर्मात तुळशी विवाहाला खूप महत्त्व आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशीला हा पवित्र सण साजरा केला जातो.
advertisement
2/6
धार्मिक मान्यतेनुसार, यादिवशी भगवान विष्णु आणि तुळशीचे लग्न होते. यामुळे दाम्पत्याच्या आयुष्यात सुख-समृद्धी येते. तुळशी विवाह केल्याने जीवनात शांती आणि सौभाग्य प्राप्त होते.
advertisement
3/6
याशिवाय, घरात सुख-समृद्धी राहावी म्हणून यादिवशी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहते आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते.
advertisement
4/6
जर तुमच्या आयुष्यात काही समस्या येत असतील किंवा प्रेमसंबंधात तुम्हाला अडचणी येत असतील तर तुळशी विवाहाच्या दिवशी आपल्या जोडीदारासह मंगलाष्टकचे पठण करणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मकता आणि मधुरता येते.
advertisement
5/6
तसेच अखंड सौभाग्यासाठी किंवा संततीच्या प्राप्तीसाठी तुळशी विवाहाच्या दिवशी भगवान शालिग्राम आणि तुळशी मातेचा विवाह करावा. विधीनुसार हा इस विवाह करावा. तसेच सोळा श्रृंगाराच्या वस्तू तुळशी मातेला अर्पित कराव्या. यामुळे देवीमातेचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख शांती कायम राहते.
advertisement
6/6
सूचना : ही माहिती राशिचक्र, धर्म आणि शास्त्राच्या आधारे ज्योतिषी आणि आचार्यांशी केलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. कोणताही वैयक्तिक सल्ला नाही. याबाबत लोकल-18 कोणताही दावा करत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Tulsi Vivah 2024 : तुळशी विवाहाच्या दिवशी करा हे सोपे उपाय, आर्थिक फायदा होणार, सुटतील अनेक समस्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल