सारंकाही घडेल मनासारखं, पण करू नका घाई, 'ही' असेल तुमची रास तर अडकू शकता संकटात!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
3 फेब्रुवारीला चंद्र आणि शुक्र ग्रहांची मीन राशीत युती होणार आहे. त्यातून 'कला योग' जुळून येतोय, ज्याचा विविध राशींच्या व्यक्तींना प्रचंड लाभ होईल, असं ज्योतिषांनी सांगितलं आहे. (गुलशन कश्यप, प्रतिनिधी)
advertisement
1/7

ज्या राशीच्या व्यक्तींसाठी कला योग फायद्याचा ठरेल त्यात धनू राशीचा समावेश आहे. धनू राशीच्या व्यक्तींसाठीही हा दिवस अत्यंत लाभदायी ठरेल. कला योगाच्या कृपेनं त्यांच्यासाठी अगदी भाग्य उजळवणारा असा हा दिवस असेल.
advertisement
2/7
ज्योतिषी पंडित शत्रुघ्न यांनी दिलेल्या माहितीनुसार, धनू राशीच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास वाढेल. त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या करियरमध्ये दिसून येईल. विशेष म्हणजे नव्या संधी मिळतील.
advertisement
3/7
दिवस कितीही सकारात्मक असला तरी धनू राशीच्या व्यक्तींना आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला हवं. नाहीतर यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. परंतु राग ताब्यात ठेवला, तर मात्र विशेष लाभ प्राप्त होऊ शकतो.
advertisement
4/7
ज्योतिषांनी सांगितलं की, धनू राशीच्या व्यक्तींना समोर विविध संधी दिसत असल्या तरी अजिबात कोणताही निर्णय घाई-गडबडीत घेऊ नये. नाहीतर त्यातून नुकसान होऊ शकतं.
advertisement
5/7
गुंतवणुकीच्या बाबतीत हा दिवस अतिशय फायद्याचा आहे. या दिवशी केलेल्या गुंतवणुकीतून भविष्यात उत्तम नफा मिळू शकेल.
advertisement
6/7
नातेसंबंधांबाबत मात्र दिवस जरा अडचणींचा ठरू शकतो. आपल्या खास व्यक्तीचं मन अस्वस्थ राहील. त्यांचं मन जपण्याचा प्रयत्न करावा, त्यांची काळजी घ्यावी.
advertisement
7/7
सूचना: इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
सारंकाही घडेल मनासारखं, पण करू नका घाई, 'ही' असेल तुमची रास तर अडकू शकता संकटात!