माजी IAS अधिकाऱ्याची रामभक्ती, 4 किलो सोन्यापासून तयार केलेले रामायण रामललाला भेट, photos
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
आता अयोध्येला येणाऱ्या भाविकांना प्रभू श्रीरामसह सोन्यापासून तयार करण्यात आलेल्या रामायणाचेही दर्शन होणार आहे. राम मंदिराच्या गर्भगृहातील प्रभू रामाच्या मूर्तीपासून 15 फूट अंतरावर दगडी आसनावर हे रामायण ठेवण्यात आले आहे. (सर्वेश श्रीवास्तव/अयोध्या, प्रतिनिधी)
advertisement
1/6

अयोध्येत 22 जानेवारीला रामललाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर लाखोंच्या संख्येने भाविक याठिकाणी लाडक्या रामरायाच्या दर्शनासाठी येत आहेत. अनेक जण याठिकाणी विविध प्रकारच्या भेटवस्तूही देत आहेत. यातच आता मध्यप्रदेश केडरचे आणि चेन्नई येथील रहिवासी माजी आयएएस अधिकारी यांनी श्रीरामाला अनोखी भेट दिली आहे.
advertisement
2/6
सुब्रमण्यम लक्ष्मी नारायण असे या माजी आयएएस अधिकाऱ्यांचे नाव आहे. त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या कमाईने एक विशेष सुवर्ण जडित रामायण तयार करून प्रभू रामाच्या चरणी अर्पण केले.
advertisement
3/6
चैत्र रामनवमीच्या पहिल्या दिवशी सुब्रमण्यम लक्ष्मी नारायण यांनी आणि त्यांच्या पत्नीने राम मंदिराला सोन्याचे रामायण दिले. यावेळी विधीनुसार राम मंदिर परिसरात या रामायणाची पूजा करण्यात आली.
advertisement
4/6
इतकेच नव्हे तर रामायणाची खासियत अशी आहे की, प्रत्येक पान तांब्यापासून तयार करण्यात आले आहे. याचा आकार 14×12 इंच आहे. यावर रामचरितमानसचे श्लोक लिहिले गेले आहेत. इतकेच नव्हे तर जवळपास या महाकाव्याच्या प्रत्येक पानावर 24 कॅरेट सोने वापरण्यात आले आहे.
advertisement
5/6
मिळालेल्या माहितीनुसार, या रामायणात सुमारे सोनेरी आकृतीमध्ये जवळपास 480 ते 500 पाने आहेत. तसेच हे 151 किलो तांबे आणि तीन ते चार किलो सोन्यापासून बनवलेले आहे. या रामायणाची निर्मिती चेन्नईच्या प्रसिद्ध बूममंडी बंगारू ज्वेलर्सने केली आहे.
advertisement
6/6
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितले की, माजी आयएएस अधिकारी यांनी राम मंदिरात रामललाच्या चरणी सोन्याचे रामायण अर्पण केले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
माजी IAS अधिकाऱ्याची रामभक्ती, 4 किलो सोन्यापासून तयार केलेले रामायण रामललाला भेट, photos