TRENDING:

Ganesh Mantra: बाप्पा दूर करतील तुमच्यावरील विघ्न-संकटे! नियमित या मंत्राचा जप मनोकामना करेल पूर्ण

Last Updated:
Ganesh Mantra Marathi : गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणतात. सर्व देवतांमध्ये गणेशाची प्रथम पूजा केली जाते, म्हणून त्याला प्रथम पूजनीय देवता असंही म्हणतात. कोणत्याही शुभ कार्यात प्रथम प्राधान्य श्रीगणेशाच्या पूजेला असते. आठवड्यातील बुधवार हा बाप्पाची पूजा करण्याचा सर्वात शुभ दिवस मानला जातो. बुधवारी रिद्धी सिद्धी दाता श्रीगणेशाची आराधना केल्यानं सुख आणि सौभाग्य प्राप्त होते आणि ग्रह दोषांचा प्रभाव कमी होतो. तुम्हाला पूजेचे दुहेरी लाभ मिळवायचे असतील तर तुम्ही काही मंत्रांचा जप अवश्य केला पाहिजे. या मंत्रांचा जप केल्यानं श्रीगणेश प्रसन्न होऊन तुमच्या मनोकामना पूर्ण करतील. ज्योतिषी पं. ऋषिकांत मिश्रा शास्त्री यांच्याकडून जाणून घेऊया बुधवारी गणपतीची पूजा करताना कोणते मंत्र जपावेत-
advertisement
1/6
बाप्पा दूर करेल तुमची विघ्न-संकटे! नियमित या मंत्राचा जप मनोकामना करेल पूर्ण
‘ॐ गं गणपतये नमः’‘गजानंद एकाक्षर मंत्र’ हा गणपतीचा सर्वात सोपा आणि प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा जप केल्यानं भक्तांची सर्व संकटे दूर होतात. बुधवारी पूजा करताना या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. यामुळे तुमची सर्व कामे यशस्वी होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
advertisement
2/6
‘ॐ वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटि समप्रभ:।निर्विघ्नं कुरू मे देव, सर्व कार्येषु सर्वदा।।’ अर्थ- श्रीगणेशाचा हा मंत्र सर्वाधिक लोकप्रिय आहे. या मंत्राचा अर्थ असा आहे की, ज्याची सोंड वक्र आहे, ज्याचे शरीर विशाल आहे, जो करोडो सूर्यासारखा तेजस्वी आहे, तो देव मला माझी सर्व कार्ये विना अडथळा पूर्ण करण्यासाठी प्रसन्न होवो. यामुळे बाप्पा प्रसन्न होतो आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
advertisement
3/6
ॐ श्रीं गं सौम्याय गणपतये वर वरद सर्वजनं में वशमानय स्वाहा।अर्थ- या मंत्रामुळे समाजात मान-प्रतिष्ठा मिळते. अनेक प्रयत्न करूनही तुम्हाला तुमच्या कामात यश येत नसेल तर तुम्हाला दररोज 108 वेळा या मंत्राचा जप करावा लागेल. हा उपाय केल्यास व्यक्तीच्या रोजगाराची समस्या लगेच दूर होते.
advertisement
4/6
‘ॐ एकदन्ताय विहे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्।’गणपतीचा हा गायत्री मंत्र फलदायी मानला जातो. पूजेच्या वेळी या मंत्राचा 108 वेळा जप केल्याने व्यक्तीचे नशीब उजळते आणि सर्व कार्ये अनुकूल होतात. यासोबतच श्रीगणेशाचा विशेष आशीर्वादही प्राप्त होतो.
advertisement
5/6
'‘ॐ ऐं ह्वीं क्लीं चामुण्डायै विच्चे’कुंडलीतील बुध ग्रहाशी संबंधित दोष दूर करण्यासाठी या मंत्राचा जप प्रभावी मानला जातो.
advertisement
6/6
‘ॐ नमो गणपतये कुबेर येकद्रिको फट् स्वाहा।’गणेश कुबेर मंत्राचा जप दररोज किंवा बुधवारच्या पूजेमध्ये एक जपमाळ (108 वेळा) करा. यामुळे आर्थिक समस्या दूर होतात आणि कर्जातूनही सुटका मिळते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Ganesh Mantra: बाप्पा दूर करतील तुमच्यावरील विघ्न-संकटे! नियमित या मंत्राचा जप मनोकामना करेल पूर्ण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल