Gudi Padwa 2024: गुढीपाडवा कसा साजरा करतात? इतर राज्यात गुढीपाडव्याला काय म्हणतात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Gudi Padwa 2024 : हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून मराठी नववर्षाची सुरुवात होते आणि या दिवशी गुढीपाडव्याचा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लोक आनंदानं खरेदी करतात.
advertisement
1/7

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. यावर्षी गुढीपाडवा मंगळवार 09 एप्रिल 2024 रोजी साजरा केला जाणार आहे. देशभरातही विविध प्रकारे गुढीपाडवा साजरा केला जातो. हा सण देशातील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. त्याविषयी जाणून घेऊया.
advertisement
2/7
गोवा आणि केरळमधील कोकणी समाज गुढी पाडव्याला संवत्सर पडवो म्हणून साजरा करतात.
advertisement
3/7
कर्नाटकात गुढीपाडव्याचा हा सण युगाडी म्हणून ओळखला जातो.
advertisement
4/7
आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये गुढी पाडवा उगादी म्हणून साजरा केला जातो.
advertisement
5/7
काश्मिरी हिंदू हा दिवस नवरेह म्हणून साजरा करतात.
advertisement
6/7
मणिपूरमध्ये या दिवसाला सजिबु नोंगमा पानबा किंवा मेइतेई चेइराओबा म्हणतात.
advertisement
7/7
चैत्र नवरात्रीची सुरुवातही याच दिवशी होते. या दिवशी महाराष्ट्रातील लोक गुढी उभारतात, म्हणूनच या सणाला आपल्याकडे गुढी पाडवा म्हणतात. बांबूच्या वर चांदी, तांबे किंवा पितळेचा उलटा कलश ठेवला जातो आणि तो सुंदर साडी किंवा कापडाने सजवला जातो. साधारणपणे हे कापड भगव्या रंगाचे आणि सिल्कचे असते. गुढी, कडुलिंबाची पाने, आंब्याची देठ आणि लाल फुले यांनी सजवली जाते. घराच्या छतासारख्या उंच जागेवर गुढी ठेवली जाते, जेणेकरून ती दुरूनच दिसावी. अनेक जण घराच्या मुख्य दरवाजा किंवा गॅलऱ्यांमध्येही उभारतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Gudi Padwa 2024: गुढीपाडवा कसा साजरा करतात? इतर राज्यात गुढीपाडव्याला काय म्हणतात