अति घाई संकटात नेई! 'या' राशीच्या व्यक्तींसाठी काळ सुखाचा, पण स्वभावामुळे येऊ शकतात अडचणीत
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Astrology : येणारा काळ आपल्यासाठी कसा असेल हे आपल्या कर्मांवर, मेहनतीवर अवलंबून असतं. ज्योतिषशास्त्र सांगतं की, यात ग्रह, तारे, नक्षत्रांच्या स्थितीचाही मोलाचा वाटा असतो. जसे ग्रह, तारे, नक्षत्र चाल बदलतात, तसे विविध राशींच्या व्यक्तींचे दिवस पालटतात. एका राशीच्या व्यक्तींसाठी सध्याचा काळ अत्यंत सुखाचा आहे, परंतु त्यांची अति घाई त्यांना संकटात नेऊ शकते, असं ज्योतिषांनी सांगितलं आहे. त्यामुळे ही रास तुमची तर नाही ना? जाणून घेऊया. (ईशा बिरोरिया, प्रतिनिधी / ऋषिकेश)
advertisement
1/5

ज्या राशीच्या व्यक्तींबाबत ज्योतिषांनी ही माहिती दिली आहे, त्यांनी नवं काम सुरू करण्यासाठी सध्याचा काळ अतिउत्तम आहे. परंतु तरीही त्यांनी सतर्क राहायला हवं. विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवे, घाई-गडबडीत नुकसान होण्याची शक्यता आहे. तसंच या व्यक्तींची आर्थिक स्थिती स्थिर असेल, तरीही खर्चांवर नियंत्रण असायला हवं.
advertisement
2/5
करियरबाबतही या राशीच्या व्यक्तींसाठी काळ सकारात्मक आहे. त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळेल. नोकरीत वरिष्ठांकडून कामाचं कौतुक होईल, त्यामुळे प्रमोशन होण्याची शक्यता आहे. मात्र कामाच्या ठिकाणी कोणाशी वाद होणार नाही याची काळजी घ्यावी, संयम राखावा. करियरबाबतही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल काळ आहे, परंतु त्याबाबत अजिबात कोणतीही घाई-गडबड करू नये. प्रेमाच्या बाबतीत काळ जरा चढ-उताराचा असण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. त्यामुळे अत्यंत समजूतदारपणेच संवाद साधावा. आपलं नातं आणखी घट्ट कसं होईल याकडे लक्ष द्यावं.
advertisement
3/5
या राशीच्या व्यक्तींनी आरोग्याबाबत जरा सावध राहावं. मानसिक ताण वाढू शकतो, ज्याचा परिणाम शारीरिक स्थितीवर होईल. त्यामुळे पुरेसा आराम करावा आणि पुरेशी झोप घ्यावी. ज्यामुळे शरीर ऊर्जावान राहील आणि मन, शरीर शांत होईल. योग आणि मेडिटेशन केलं तर उत्तम.
advertisement
4/5
उत्तराखंडमधील ज्योतिषी अखिलेश पांडेय यांनी कर्क राशीच्या व्यक्तींबाबत ही सविस्तर माहिती दिली आहे. आपलं आरोग्य जपावं आणि मिळणाऱ्या सुखाने हुरळून न जाता, त्याचा विचारपूर्वक लाभ घ्यावा, असा सल्ला ज्योतिषांनी दिला आहे.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
अति घाई संकटात नेई! 'या' राशीच्या व्यक्तींसाठी काळ सुखाचा, पण स्वभावामुळे येऊ शकतात अडचणीत