कोजागिरीचा चंद्र ठरेल लाभदायी, लक्ष्मी येईल घरी, फक्त यात तुमची रास आहे का पाहा
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ग्रह, ताऱ्यांच्या स्थितीला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व असतं. त्यानुसार शरद पौर्णिमेचा म्हणजेच कोजागिरीचा चंद्र 16 कलांनी परिपूर्ण असतो, असं मानलं जातं. उद्या ही पौर्णिमा आहे, शिवाय त्याच रात्री चंद्रग्रहणही लागणार आहे. त्यामुळे हा योग अतिशय विशेष असेल.
advertisement
1/5

कशीचे ज्योतिषी स्वामी कन्हैया महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोजागिरी पौर्णिमेच्याच दिवशी समुद्र मंथनातून लक्ष्मी देवी बाहेर आली होती. त्यामुळे अशी मान्यता आहे की, या पौर्णिमेला धनाची देवता लक्ष्मी पृथ्वीभोवती भ्रमण करते. ग्रहणाचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. अर्थातच काही राशीच्या व्यक्तींना लक्ष्मी देवीचाही विशेष आशीर्वाद मिळेल. त्या राशी कोणत्या पाहूया.
advertisement
2/5
मिथुन : आपल्यासाठी कोजागिरी पौर्णिमा लाभदायी ठरेल. आपली आर्थिक स्थिती बळकट होईल. रोजगाराचे नवे स्रोत निर्माण होतील. खरंतर हे ग्रहण आपल्या आयुष्यात आनंदी आनंद आणेल.
advertisement
3/5
कर्क : आपल्या आयुष्यात हे ग्रहण सुख, समृद्धी घेऊन येणार आहे. आई-वडिलांना मुलांकडून शुभवार्ता मिळतील. नवीन वाहन खरेदीचाही योग आहे. शिवाय धनप्राप्तीचे नवे मार्ग खुले होतील.
advertisement
4/5
वृश्चिक : या ग्रहणासह आपल्या वाट्याची वाईट वेळही संपणार आहे. वैवाहिक आयुष्यात भरपूर सुख येईल. नोकरीत, कामकाजात प्रगती होईल.
advertisement
5/5
कुंभ : आपल्यासाठी ग्रहणाचा काळ धनप्राप्तीचा असेल. अचानक आर्थिक लाभ होईलच शिवाय थकलेले पैसेही सहज मिळतील. वैवाहिक आयुष्यात आनंद येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
कोजागिरीचा चंद्र ठरेल लाभदायी, लक्ष्मी येईल घरी, फक्त यात तुमची रास आहे का पाहा