TRENDING:

शनीची साडेसाती सुरू असताना घालताय नीलम… तुमची 'ही' चूक पडू शकते महागात, होईल मोठं नुकसान!

Last Updated:
रत्नशास्त्रामध्ये नीलम हे सर्वात शक्तिशाली आणि वेगाने फळ देणारे रत्न मानले जाते. नीलम हे न्यायदेवता शनिदेवाचे रत्न आहे. असे म्हटले जाते की, जर नीलम एखाद्याला मानवला, तर तो रातोरात त्याचे नशीब पालटू शकतो मात्र जर तो मानवत नसेल, तर क्षणात सर्वस्व हिरावून घेण्याची ताकदही या रत्नात आहे.
advertisement
1/7
शनीची साडेसाती सुरू असताना घालताय नीलम… तुमची 'ही' चूक पडू शकते महागात
रत्नशास्त्रामध्ये नीलम हे सर्वात शक्तिशाली आणि वेगाने फळ देणारे रत्न मानले जाते. नीलम हे न्यायदेवता शनिदेवाचे रत्न आहे. असे म्हटले जाते की, जर नीलम एखाद्याला मानवला, तर तो रातोरात त्याचे नशीब पालटू शकतो; मात्र जर तो मानवत नसेल, तर क्षणात सर्वस्व हिरावून घेण्याची ताकदही या रत्नात आहे. त्यामुळे शनीची महादशा किंवा साडेसाती सुरू असताना नीलम घालण्यापूर्वी त्याचे नियम जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे
advertisement
2/7
कुंडलीचे विश्लेषण अनिवार्य: नीलम कधीही कोणाचे ऐकून किंवा फॅशन म्हणून घालू नका. तुमची कुंडली तज्ज्ञ ज्योतिषाला दाखवून शनीची स्थिती तपासूनच हे रत्न धारण करा. जर शनी तुमच्या कुंडलीत मारक किंवा नीच स्थानी असेल, तर नीलम तुमचा विनाश करू शकतो.
advertisement
3/7
चाचणी करा: नीलम विकत घेतल्यावर तो थेट अंगठीत जडवून घालू नका. किमान 3 ते 7 दिवस तो निळ्या कापडात बांधून आपल्या उशाखाली किंवा खिशात ठेवा. जर या काळात तुम्हाला चांगली स्वप्ने पडली, धनलाभ झाला किंवा मन शांत राहिले, तरच तो तुम्हाला मानवला आहे असे समजावे.
advertisement
4/7
धातूची निवड: नीलम सहसा चांदी किंवा पंचधातूमध्ये घालणे शुभ मानले जाते. शनी आणि सूर्याचे शत्रुत्व असल्याने नीलम सोन्यामध्ये घालणे टाळावे, जोपर्यंत ज्योतिषाने विशेष सल्ला दिला नसेल.
advertisement
5/7
योग्य बोट आणि दिवस: नीलम नेहमी शनिवारी परिधान करावा. हे रत्न उजव्या हाताच्या मधल्या बोटाला घातले जाते, कारण हे बोट शनीचे स्थान मानले जाते.
advertisement
6/7
शुद्धीकरण आणि मंत्र: अंगठी घालण्यापूर्वी ती गंगाजल आणि कच्च्या दुधाने शुद्ध करा. त्यानंतर 'ॐ शं शनैश्चराय नमः' या मंत्राचा 108 वेळा जप करूनच ती धारण करावी.
advertisement
7/7
रत्नाची पारख: नीलम फुटलेला, तडा गेलेला किंवा रंगात दोष असलेला नसावा. सदोष रत्न धारण केल्याने अपघाताची किंवा मोठ्या आजारपणाची शक्यता वाढते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
शनीची साडेसाती सुरू असताना घालताय नीलम… तुमची 'ही' चूक पडू शकते महागात, होईल मोठं नुकसान!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल