Astro Tips: कधीही पैसे देऊनच घ्याव्यात या वस्तू! उधार, मागून घेतल्यानं पलटतात नशिबाचे फासे
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
5 Things Never Take Without Money : हिंदू धर्मात वास्तुशास्त्रात असे अनेक नियम सांगण्यात आले आहेत, ज्याचा अवलंब केल्याने जीवनातील अनेक समस्या टाळता येतात. दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी लोक एकमेकांना देतात. पण काही गोष्टी पैसे दिल्याशिवाय घेणे टाळा. त्याचा नकारात्मक परिणाम थेट आपल्या जीवनावर दिसून येतो. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्रकुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत.
advertisement
1/5

दही- वास्तुशास्त्रानुसार दही हा एक असा पदार्थ आहे, जो पैशाशिवाय कोणाकडूनही घेऊ नये किंवा देऊ नये. अनेकदा आपण दही लावण्यासाठी शेजाऱ्यांकडून दही उधार (विरजन) घेतो आणि घरी दही बनवण्यासाठी वापरतो. पण असं केल्यानं घरात तणाव आणि अशांततेचे वातावरण निर्माण होते, पैशाची उधळपट्टी सुरू होते. म्हणूनच चुकूनही पैसे दिल्या शिवाय दही घेऊ नये आणि देऊ नये. प्रतिमा - कॅनव्हा
advertisement
2/5
काळे तीळ- वास्तुशास्त्रात सांगितले आहे की, कोणीही काळे तीळ पैसे घेतल्याशिवाय कोणालाही देऊ नये आणि कोणाकडूनही घेऊ नये. ज्योतिषशास्त्रानुसार राहू-केतूसोबतच काळ्या तिळाचा संबंध शनि ग्रहाशीही मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीने पैशाशिवाय काळे तीळ घेतले किंवा दिले तर त्याला त्याच्या जीवनात अनावश्यक खर्चाला सामोरे जावे लागते, पैशाची उधळपट्टी सुरू होते. काळे तीळ घेण्या-देण्याचे काम शनिवारी अजिबात करू नये. प्रतिमा - कॅनव्हा
advertisement
3/5
मीठ- जेव्हा घरातील मीठ संपते तेव्हा बरेच लोक शेजारी किंवा नातेवाईकांकडून ते मागवतात, परंतु असे करू नये. वास्तुशास्त्रानुसार, तुमच्या घरातील मीठ संपले तर चुकूनही ते कोणाकडूनही मागून घेऊ नये. ज्योतिषशास्त्रात मिठाचा शनिदेवाशी संबंध सांगितला आहे. मीठ दान केल्यास शनिदेवाचा कोप होऊ शकतो. पैशाशिवाय मिठाचा व्यवहार रोग आणि दोषांना आमंत्रण देतो. असे केल्याने व्यक्ती कर्जात बुडू शकते. प्रतिमा - कॅनव्हा
advertisement
4/5
रुमाल- वास्तुशास्त्रानुसार रुमाल देखील उधारीवर किंवा इतराचा घेऊ नये किंवा देऊ नये. कारण असे केल्याने घरात भांडणे वाढतात आणि जीवनात अनेक समस्या येऊ लागतात. याशिवाय रुमाल कोणालाही भेट म्हणून देऊ नये. असे केल्याने त्या नात्यातील अंतर वाढणार हे निश्चित. प्रतिमा - कॅनव्हा
advertisement
5/5
माचिस- वास्तुशास्त्रानुसार आगपेटी पैशाशिवाय कोणाकडूनही घेऊ नये किंवा देऊ नये. कारण माचिसचा थेट संबंध आगीशी असतो. असे केल्याने नातेवाईकांमध्ये राग, वाद वाढू शकतो. घरातील शांतता भंग होऊ शकते. याशिवाय इतरही समस्या येऊ शकतात. प्रतिमा - कॅनव्हा(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Astro Tips: कधीही पैसे देऊनच घ्याव्यात या वस्तू! उधार, मागून घेतल्यानं पलटतात नशिबाचे फासे