मनी प्लांट नाही 'हे' रोप देतं पैसा! कोणापुढे हात पसरायची वेळ येत नाही
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
घरात सतत एकामागून एक अडचणी येत असतील. घरातली शांतता भंग झालीये असं वाटत असेल, तर काही उपाय करणं आवश्यक असतं. उपाय म्हणजे खूप खर्च करायचा असं नाही, तर घरात लहान लहान बदल करायचे. कायम सुख, शांती नांदावी यासाठी घरात सकारात्मक बदल करायचे. त्यापैकीच एका बदलाबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. (रिया पांडे, प्रतिनिधी / दिल्ली)
advertisement
1/5

ज्योतिषी चेतन भारद्वाज सांगतात की, घरात तुळशीचं रोप असणं अत्यंत शुभ मानलं जातं. या रोपामुळे घरातलं सगळं दारिद्र्य दूर होऊन सुख, शांतीचं आगमन व्हायला सुरुवात होते.
advertisement
2/5
ज्योतिषशास्त्रात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीला देवी लक्ष्मीचं रूप मानतातं. जिथं लक्ष्मी देवीचा वास असतो तिथं आर्थिक अडचणी येत नाहीत असं म्हणतात.
advertisement
3/5
महत्त्वाचं म्हणजे तुळशीचं रोप घरात कुठेही ठेऊ नये. ते मुख्य दरवाज्यात उत्तर किंवा पूर्व दिशेतच असायला हवं. त्यामुळे घरात कधीच नकारात्मक शक्तीचं आगमन होत नाही.
advertisement
4/5
तुळशीच्या रोपाची दररोज न चूकता पूजा केल्यास, जल अर्पण केल्यास घराची <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/rare-coincidence-after-10-years-on-akshaya-tritiya-will-be-definitely-beneficial-for-3-zodiac-signs-l18w-mhij-1178133.html">आर्थिक भरभराट</a> होते. घरातल्या कोणत्याही व्यक्तीला कधीच <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/the-best-finger-for-a-gold-ring-l18w-mhij-1178096.html">आर्थिक</a> चणचण भासत नाही, अशी मान्यता आहे.
advertisement
5/5
सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
मनी प्लांट नाही 'हे' रोप देतं पैसा! कोणापुढे हात पसरायची वेळ येत नाही