TRENDING:

4 राशींच्या व्यक्तींनी पैसे मोजायला तयार राहावं! जन्माष्टमीला सुधरू शकते परिस्थिती

Last Updated:
Janmashtami 2024 horoscope: संपूर्ण देशभरात 26 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होईल. या दिवशी अत्यंत दुर्मीळ योग जुळून येणार आहेत. ज्योतिषी पंडित आनंद भारद्वाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा जन्माष्टमीला सर्वार्थ सिद्धी, गजकेसरी आणि शश हे शुभ योग निर्माण होतील. ज्यांचा 4 राशींवर अत्यंत सकारात्मक प्रभाव पडेल. या राशींच्या व्यक्तींना येत्या काळात भरपूर सुख अनुभवायला मिळेल, असं ज्योतिषी म्हणाले. (शुभम मरमट, उज्जैन)
advertisement
1/5
4 राशींच्या व्यक्तींनी पैसे मोजायला तयार राहावं! जन्माष्टमीला सुधणार परिस्थिती
मेष : या राशीचा स्वामी ग्रह आहे मंगळ. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती कृष्ण जन्माष्टमीला नक्कीच सुधारेल. गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल आहे. आता केलेल्या गुंतवणुकीतून भविष्यात उत्तम नफा मिळू शकतो. या व्यक्ती नोकरीच्या शोधात असतील तर आता चांगली संधी मिळू शकते.
advertisement
2/5
वृषभ : या राशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र. त्यामुळे जन्माष्टमीला जुळून येणाऱ्या विशेष संयोगाचा या राशीच्या व्यक्तींना विशेष लाभ मिळेल. नोकरी, व्यवसायाची स्थिती आता आधीपेक्षा सुधारेल. आव्हानं कमी होतील. जुन्या मालमत्तेतून फायदा मिळू शकतो, आर्थिक स्थिती भक्कम होईल. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल. कुटुंबात प्रसन्न वातावरण असेल.
advertisement
3/5
सिंह : या राशीचा स्वामी ग्रह आहे सूर्य. त्यामुळे जन्माष्टमीला जुळून येणाऱ्या दुर्मीळ योगांमुळे साक्षात श्रीकृष्णाचा आशीर्वाद या राशीच्या व्यक्तींना मिळेल. याचा सर्वाधिक फायदा होईल करियरमध्ये. पैशांबाबतच्या सर्व अडचणी आता हळूहळू दूर होतील. या व्यक्तींनी कृष्णाला खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करणं लाभदायी ठरेल.
advertisement
4/5
कुंभ : या राशीचा स्वामी ग्रह आहे शनी. जन्माष्टमीला जुळून येणारा दुर्मीळ संयोग या राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ ठरेल. लहान मुलांना मोठी संधी मिळू शकते. मोठ्यांच्या पैशांसंबंधित अडचणी दूर होऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतून आता लाभ मिळेल. बिघडलेली कामं मार्गी लागतील.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
4 राशींच्या व्यक्तींनी पैसे मोजायला तयार राहावं! जन्माष्टमीला सुधरू शकते परिस्थिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल