Pitru Paksha 2023: पितृपक्षात जन्मलेल्या मुलांचा आणि पूर्वजांचा काय संबंध असतो?
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
pitru paksha children born: आपले पूर्वज आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि आपल्या अडचणी दूर करण्यासाठी पितृ पक्षात पृथ्वीवर येतात, असे हिंदू पौराणिक कथांमध्ये सांगितले गेले आहे. हिंदू धर्मात पितृपक्षाच्या वेळी सर्वजण आपल्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांच्यासाठी पिंडदान-दानधर्माचे पालन करतात. पितृपक्ष सध्या सुरू असून तो 14 ऑक्टोबर 2023 पर्यंत चालणार आहे. पितृपंधरवड्याच्या काळात जन्मलेल्या मुलाचे भविष्य काय असेल, त्या मुलांचा स्वभाव कसा असेल, या सर्व प्रश्नांची उत्तरे पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून जाणून घेऊया.
advertisement
1/5

पितृपक्षात जन्मलेली मुले भाग्यवान -ज्योतिषांच्या मते, पितृ पक्षामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नसले तरी या दिवशी जन्मलेली मुले खूप शुभ आणि भाग्यवान असतात.
advertisement
2/5
पितृ पक्षात जन्मलेल्या मुलांना पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. असे मानले जाते की, अशी मुले त्यांच्याच कुळातील पूर्वज असतात. ही मुले कुटुंबाच्या उन्नतीसाठी काम करतात. अशी मुले घरातील लोकांना नेहमीच महत्त्व देतात.
advertisement
3/5
मुलांचा स्वभाव -शास्त्रानुसार पितृ पक्षात जन्मलेली मुले खूप सृजनशील असतात. अशा मुलांचा जन्म एका खास उद्देशासाठी होतो. अशी मुले अतिशय आनंदी स्वभावाची असतात. त्याला आपल्या कुटुंबाबद्दल खूप आपुलकी असते.
advertisement
4/5
सकारात्मक विचार करण्यासोबतच ते योग्य निर्णय घेण्यास सक्षम असतात. ही मुले अगदी लहान वयातच मोठे यश मिळवतात.
advertisement
5/5
तथापि, पितृ पक्षात जन्मलेल्या मुलांच्या कुंडलीत चंद्र कमकुवत स्थितीत असतो, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात काही अडथळे येतात. मात्र, ज्योतिषीय उपायांनी चंद्र मजबूत केला जाऊ शकतो.(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Pitru Paksha 2023: पितृपक्षात जन्मलेल्या मुलांचा आणि पूर्वजांचा काय संबंध असतो?