TRENDING:

Pitru Paksha 2025: पितृपक्षात शुभ कार्य का करत नाहीत? श्राद्ध का करतात? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Last Updated:
Pitru Paksha 2025: भाद्रपद महिन्यातल्या पौर्णिमेनंतर पितृपंधरवड्याला प्रारंभ होतो. या काळात पूर्वजांचं स्मरण केलं जातं. परंतु, शुभ कार्ये वर्ज्य केली जातात. याबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/7
पितृपक्षात शुभ कार्य का करत नाहीत? श्राद्ध का करतात? संपूर्ण माहिती एका क्लिकवर
भारतीय संस्कृतीत विविध प्रथा-परंपरा, सण-उत्सव, चालीरीतींना विशेष महत्त्व दिलं आहे. मराठी कालगणनेनुसार अनंत चतुर्दशीला गणेशोत्सवाची सांगता होते आणि पौर्णिमा संपली की पितृपक्ष म्हणजेच पितृपंधरवडा सूर होतो. यालाच श्राद्ध पक्ष असं देखील म्हटलं जातं.
advertisement
2/7
भाद्रपद महिन्यातल्या पौर्णिमेनंतर पितृपक्षाला प्रारंभ होतो. आज, 7 सप्टेंबरपासून या वेळचा पितृपंधरवडा सुरू झाला आहे. भाद्रपद अमावास्या म्हणजेच सर्वपित्री अमावास्येपर्यंत हा पितृपंधरवडा असतो. यंदा 21 सप्टेंबर पर्यंत पितृपक्ष असून या कालावधीत कोणतीही शुभ कार्यं केली जात नाहीत.
advertisement
3/7
आपल्याकडे या पंधरवड्यात पूर्वजांचं स्मरण करण्याची परंपरा आहे. यंदा आज, 7 सप्टेंबरपासून पितृपंधरवड्याला सुरुवात झाली आहे. या कालावधीत जावळ, साखरपुडा, विवाह आणि गृह खरेदी, गृह प्रवेश निषिद्ध मानला जातो. याशिवाय विवाह जुळवण्याविषयीची बोलणीदेखील या कालावधीत केली जात नाहीत. यामागे धर्मशास्त्रीय दृष्टीनं अनेक कारणं सांगितली जातात.
advertisement
4/7
आपले पूर्वज म्हणजेच पितर हे आपल्यासाठी आदरणीय, पूजनीय असतात. पितृपक्षात ते आपल्याकडे येतात असा समज आहे. त्यामुळे पितृपंधरवडा हा त्यांच्याप्रति आदर व्यक्त करण्याचा काळ मानला जातो. त्यामुळे हा कालावधी शुभ कार्यांसाठी वर्ज्य मानला जातो. पितरांचं पूजन आणि स्मरण केल्यानं आपल्या वंशजांना वाटणारी आपुलकी पाहून ते समाधान व्यक्त करतात, असाहीसमज असल्याचं ज्योतिषाचार्य डॉ. अरविंद मिश्रा सांगतात.
advertisement
5/7
पितर पूजनानिमित्त श्राद्धावेळी पंडित किंवा संबंधित व्यक्तीला जेवण दिलं जातं. हे भोजन थेट पितरांपर्यंत पोहोचतं असा समज आहे. त्यामुळं या व्यक्तींना सन्मानपूर्वक आणि श्रद्धेनं जेवायला बोलावलं जातं. श्राद्धासाठी दुपारी 12 ते 12.30 ही वेळ श्रेयस्कर मानली जाते आणि त्यामुळे या काळात भोजन दिलं जातं.
advertisement
6/7
श्राद्धावेळी जेव्हा ब्राह्मणभोजन केलं जातं, तेव्हा अन्नपदार्थ दोन्ही हातांनी वाढावेत. या काळात फार बोलू नये. तसंच श्राद्धाच्या दिवशी जेवण तयार करताना शुद्धतेची पूर्ण काळजी घेणं गरजेचं आहे. अन्नपदार्थांमध्ये जमिनीखाली उगवणाऱ्या भाज्यांचा म्हणजेच कांदा, लसूण यांचा वापर करू नये. जेवणानंतर ब्राह्मण किंवा संबंधिताला यथोचित दक्षिणा आणि वस्त्रं दान करावीत. त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्याव, असं डॉ. मिश्रा सांगतात.
advertisement
7/7
या पंधरवड्यात पितृलोकात पाण्याची कमतरता असते. त्यामुळे आपले पूर्वज पृथ्वीवरच्या आप्तस्वकीयांकडे येतात. जेव्हा वंशज तर्पण करतात, तेव्हा पितर तृप्त होतात आणि त्यांना शांती लाभते. यामुळे कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी राहते. पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी पितृपंधरवड्यात त्यांच्याप्रति आदरभाव व्यक्त करून, पूजाविधी करावेत, असंही डॉ. मिश्रा सांगतात. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Pitru Paksha 2025: पितृपक्षात शुभ कार्य का करत नाहीत? श्राद्ध का करतात? संपूर्ण माहिती एका क्लिकवर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल