TRENDING:

अद्भुत! वर्षांमागून वर्षे सरले, अखेर निर्जला एकादशीला ते 3 शुभ योग जुळून आले

Last Updated:
वर्षभरातल्या सर्व एकादशींना ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. तर, निर्जला एकादशीचं व्रत हे अत्यंत खास मानलं जातं, कारण त्यातून 24 एकादशींसमान फळ प्राप्त होतं असं म्हणतात. परंतु हे व्रत तितकंच कडकही असतं, त्यामुळे त्याचं योग्य पालन करणं आवश्यक आहे. (मोहित शर्मा, प्रतिनिधी / करौली)
advertisement
1/5
अद्भुत! वर्षांमागून वर्षे सरले, अखेर निर्जला एकादशीला ते 3 शुभ योग जुळून आले
भगवान विष्णूंना प्रिय असलेलं हे व्रत पाळल्यास वर्षभराचं पुण्य मिळतं, शिवाय आरोग्यही सुदृढ राहतं. यंदा 18 जून रोजी ही एकादशी होती. महत्त्वाचं म्हणजे यंदाच्या निर्जला एकादशीला वर्षांमागून वर्षे सरल्यानंतर काही खास संयोग जुळून आले.
advertisement
2/5
मूळातच एकादशीचं व्रत अत्यंत फलदायी मानलं जातं. त्यात 3 अद्भुत योगांमुळे यंदा निर्जला एकादशीचं महत्त्व आणखी वाढलं. ज्योतिषी धीरज शास्त्री यांनी सांगितलं की, शिव योग, पुष्कर योग आणि ध्वज योग हे खास योग जुळून या दिवशी जुळून आले.
advertisement
3/5
ज्योतिषांनी सांगितलं की, लहान मुलांसह वृद्ध व्यक्तींसाठी हे व्रत महत्त्वपूर्ण असतं. परंतु ज्यांना शक्य असेल त्यांनीच ते करावं, कारण ते काटेकोरपणे पाळणं आवश्यक असतं. असं म्हणतात की, या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण देवी-देवतांनीही या व्रताचं पालन केलं होतं.
advertisement
4/5
<a href="https://news18marathi.com/photogallery/religion/purnima-is-lucky-for-three-zodiac-signs-l18w-mhij-1199479.html">ज्योतिषी</a> धीरज शास्त्री यांनी सांगितलं की, निर्जला एकादशीच्या व्रतामुळे केवळ वर्षभराच्या सर्व एकादशींची फलप्राप्ती होत नाही, तर उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यही प्राप्त होतं.
advertisement
5/5
सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/when-rahu-enters-nakashtra-three-zodiac-signs-will-shine-l18w-mhij-1200418.html">श्रद्धेवर</a> आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
अद्भुत! वर्षांमागून वर्षे सरले, अखेर निर्जला एकादशीला ते 3 शुभ योग जुळून आले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल