TRENDING:

महिलांचे गुलाबी आणि पांढरे नख सांगतात त्यांचा स्वभाव आणि भाग्य, सामुद्रिक शास्त्रात सांगितलं यामागचं रहस्य

Last Updated:
स्त्रियांच्या नखांवरून त्यांच्या स्वभाव, आरोग्य आणि जीवनातील स्थिरतेबद्दल अनेक गोष्टी समजून घेता येतात.
advertisement
1/5
गुलाबी नख म्हणजे सौंदर्य नाही तर... सामुद्रिक शास्त्रात सांगितलं रंगामागचं रहस्य
हिंदू धर्मातील सामुद्रिक शास्त्रानुसार मानव शरीर हा फक्त शारीरिक रचना नसून त्यात व्यक्तीचा स्वभाव, भाग्य आणि मानसिक स्थिती यांचेही संकेत दडलेले असतात. सामुद्रिक शास्त्र हे एक प्राचीन शास्त्र आहे, जे शरीराच्या प्रत्येक अंगातून माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचं आणि भविष्यातील परिस्थितीचं विश्लेषण करतं. चेहरा, डोळे, पाय, हात या सर्वांप्रमाणेच नखं देखील या शास्त्रात महत्त्वाची भूमिका बजावतात. विशेषतः स्त्रियांच्या नखांवरून त्यांच्या स्वभाव, आरोग्य आणि जीवनातील स्थिरतेबद्दल अनेक गोष्टी समजून घेता येतात.
advertisement
2/5
सामुद्रिक शास्त्रानुसार, ज्या मुलींची नखं स्वच्छ आणि नीटनेटकी असतात, त्या मुली सुंदर, आकर्षक आणि स्वच्छतेची आवड असणाऱ्या असतात. अशा स्त्रिया जीवनात शिस्तप्रिय आणि व्यवस्थित वागणाऱ्या असतात. पण जर नखं लांब असतील त्यांची योग्य देखभाल केली जात नसेल, तर ते मनातील अस्थिरतेचं आणि एकाग्रतेच्या कमतरतेचं लक्षण मानलं जातं.
advertisement
3/5
गुलाबी आणि चमकदार नखं हे चांगल्या आरोग्याचं आणि सकारात्मक उर्जेचं प्रतीक आहे. अशा स्त्रिया आत्मविश्वासू, उत्साही आणि जीवनाकडे आनंदाने पाहणाऱ्या असतात. दुसरीकडे, पिवळसर किंवा फिकट नखं असणं हे शरीरात किंवा मनात कमजोरी असल्याचं द्योतक मानलं जातं. सामुद्रिक शास्त्रानुसार, अशा स्थितीला ऊर्जा आणि जीवनशक्तीच्या अभावाशी जोडून पाहिलं जातं.
advertisement
4/5
जर नखं खडबडीत किंवा तुटलेली असतील, तर ते व्यक्तीच्या तणावग्रस्त आणि असंतुष्ट स्वभावाकडे इशारा करतात. अशा मुलींच्या मनात सतत अस्थिरता किंवा नाराजी असते. परंतु नखांवर पांढरे ठिपके दिसत असतील, तर ते शुभ संकेत मानले जातात. हे यश, आनंद किंवा चांगल्या घडामोडींचं सूचक असतं.
advertisement
5/5
थोडक्यात सांगायचं झालं तर, नखं केवळ सौंदर्याचं प्रतीक नाहीत, तर ती व्यक्तिमत्त्व, आरोग्य आणि मानसिक स्थिती यांचं आरशासारखं प्रतिबिंब दाखवतात. म्हणूनच, आपल्या नखांची स्वच्छता आणि काळजी घेणं हे केवळ सौंदर्यापुरतं नव्हे, तर जीवनात संतुलन राखण्यासाठीही आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
महिलांचे गुलाबी आणि पांढरे नख सांगतात त्यांचा स्वभाव आणि भाग्य, सामुद्रिक शास्त्रात सांगितलं यामागचं रहस्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल