शनिची कृपा! 28 नोव्हेंबरपासून सकाळी 7:26 वाजेनंतर या राशींचा गोल्डन टाइम होणार सुरू
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Shani Margi 2025 : ज्योतिषशास्त्रात शनि हा कर्म, परिश्रम आणि कर्तव्याचे फळ देणारा अत्यंत प्रभावी ग्रह मानला जातो. एखाद्याच्या कुंडलीत शनि मजबूत स्थितीत असेल, तर त्या व्यक्तीला जीवनात मान-सन्मान आणि आर्थिक स्थैर्य लाभते, असे ज्योतिषज्ञ सांगतात.
advertisement
1/5

ज्योतिषशास्त्रात शनि हा कर्म, परिश्रम आणि कर्तव्याचे फळ देणारा अत्यंत प्रभावी ग्रह मानला जातो. एखाद्याच्या कुंडलीत शनि मजबूत स्थितीत असेल, तर त्या व्यक्तीला जीवनात मान-सन्मान आणि आर्थिक स्थैर्य लाभते, असे ज्योतिषज्ञ सांगतात. सध्या शनि मीन राशीत वक्री अवस्थेत आहे. मात्र 28 नोव्हेंबर 2025 रोजी हा ग्रह मार्गी गतीने प्रवास सुरू करणार आहे. शनिच्या या बदलाचा काही राशींवर अत्यंत सकारात्मक परिणाम होणार असून त्यांचे भाग्य उजळणार आहे.
advertisement
2/5
ज्योतिषशास्त्रानुसार, 28 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 7:26 वाजता शनि मीन राशीत थेट गतीने प्रवास सुरू करेल. शनि मार्गी होताच, दीर्घकाळापासून अडथळ्यांना सामोरे जाणाऱ्या काही राशींना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषत: साडेसातीचा प्रभाव भोगणाऱ्यांसाठी हा टप्पा वरदानासारखा ठरणार आहे. 26 नोव्हेंबरपासून घडणारे बदल आर्थिक स्थिती मजबूत करतील आणि धनलाभाच्या नव्या संधी निर्माण करतील.
advertisement
3/5
मेष - सध्या मेष राशीच्या जातकांवर शनीच्या साडेसातीचा प्रारंभिक टप्पा सुरू आहे. वक्री स्थितीत असलेल्या शनिमुळे अनेकांना अडचणी, विलंब आणि मानसिक तणाव जाणवत होता. मात्र आता शनि थेट होताच परिस्थिती झपाट्याने सुधारू लागेल. प्रयत्नांना यश मिळू लागेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा स्थिर आणि मजबूत होईल.परदेश प्रवासाची शक्यता आहे .नवी आर्थिक संधी आणि गुंतवणुकीत फायदा कुटुंब, विशेषत: पालकांचा पाठिंबा वाढेल.
advertisement
4/5
कुंभ - कुंभ राशीचा स्वामी ग्रह स्वयं शनि असल्याने, त्याच्या मार्गी हालचालीचा थेट लाभ या राशीला मिळणार आहे. बराच काळ तणावाखाली असलेले कुंभ राशीचे जातक आता दिलासा अनुभवतील.अडकलेली कामे मार्गी लागतील. प्रवासातून फायदा होईल.आर्थिक परिस्थिति मजबूत होईल. करिअरमध्ये नवी संधी किंवा नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
मीन - मीन हीच राशी असल्याने शनिचा थेट प्रभाव इथल्या जातकांवर सर्वाधिक जाणवेल. वक्री शनिमुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांवर आता मार्गी शनिमुळे उपाय सापडतील. आर्थिक स्थिती सुधारेल.व्यवसायात प्रगती होईल. नवी नोकरी किंवा महत्त्वाचे करार मिळण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
शनिची कृपा! 28 नोव्हेंबरपासून सकाळी 7:26 वाजेनंतर या राशींचा गोल्डन टाइम होणार सुरू