TRENDING:

Surya Mantra: या सूर्य मंत्रांनी करा दिवसाची सुरुवात, भाग्यात यश आणि कीर्तीचे जुळतील योग

Last Updated:
Surya Mantras: रविवार विशेषत: सूर्य-नारायणाची पूजा केली जाते, रविवार सूर्य देवाला समर्पित मानला जातो. या दिवशी सकाळी सूर्याला तांब्याच्या कलशातून जल अर्पण केल्याने मनुष्याला अनेक लाभ होतात, संकटे दूर राहतात, असे मानले जाते. कुंडलीतील कमकुवत सूर्य देखील त्यामुळे बलवान होतो. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्रकुमार शर्मा सांगत आहेत, असे 5 मंत्र ज्यांचा रविवारी जप करणं आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.
advertisement
1/7
या सूर्य मंत्रांनी करा दिवसाची सुरुवात, भाग्यात यश आणि कीर्तीचे जुळतील योग
1. ॐ हृां मित्राय नम:- धार्मिक श्रद्धेनुसार, तुम्हाला चांगले आरोग्य मिळवायचे असेल आणि तुमची काम करण्याची क्षमता वाढवायची असेल, तर सूर्यदेवाला अर्घ अर्पण करताना हा पहिला मंत्र नियमितपणे जपला पाहिजे. प्रतिमा - कॅनव्हा
advertisement
2/7
2. ॐ हृीं रवये नम:- पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांच्या मते, एखाद्याला क्षयरोगाचा त्रास होत असेल आणि तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारायचे असेल तर सूर्य देवासमोर उभे राहून या मंत्राचा जप करा. कफ इत्यादींशी संबंधित आजारही यामुळे बरे होतात, असे मानले जाते. प्रतिमा - कॅनव्हा
advertisement
3/7
3. ॐ हूं सूर्याय नम:- धार्मिक मान्यतेनुसार, मानसिक शांतीसाठी सूर्यदेवाच्या या मंत्राचा जप करावा. यामुळे बुद्धिमत्ताही वाढते. प्रतिमा - कॅनव्हा
advertisement
4/7
4. ॐ हृ: पूषणे नम:- ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, जर तुम्हाला तुमची शक्ती आणि धैर्य वाढवायचे असेल तर या मंत्राचा जप करा. यामुळे माणसाचे मनही धार्मिक कार्यात गुंतलेले राहते. प्रतिमा - कॅनव्हा
advertisement
5/7
5. ॐ ह्रां हिरण्यगर्भाय नमः- ज्योतिषशास्त्रानुसार, विद्यार्थ्यांना विशेषत: या मंत्राचा लाभ होतो. त्याच्या जपाने शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक शक्तींचा विकास होतो. प्रतिमा - कॅनव्हा
advertisement
6/7
6. ॐ सवित्रे नमः- वैदिक ज्योतिषानुसार या मंत्राचा जप केल्याने मनुष्याचा आदर वाढतो. यासोबतच सूर्यदेवाची विशेष कृपा राहते. याशिवाय माणसाची कल्पनाशक्तीही वाढते. प्रतिमा - कॅनव्हा
advertisement
7/7
7. ॐ अर्काय नमः- धार्मिक मान्यतांनुसार, जर तुम्हाला वेदांचे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर या मंत्राचा जप करणे फायदेशीर ठरू शकते. याशिवाय या मंत्राचा जप केल्याने मन मजबूत होते. आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात, असे मानले जाते. प्रतिमा - कॅनव्हा (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Surya Mantra: या सूर्य मंत्रांनी करा दिवसाची सुरुवात, भाग्यात यश आणि कीर्तीचे जुळतील योग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल