TRENDING:

पैसाच पैसा! शुक्र-सूर्य आणणार राजयोग, 3 राशींचं नशीब पालटेल; बँक बॅलन्स वाढेल

Last Updated:
जेव्हा 2 ग्रह एका राशीत एकत्र येतात तेव्हा त्यांची युती झाली असं म्हणतात. काही युतींमधून राजयोग निर्माण होतात. आता वृषभ राशीत शुक्र आणि सूर्य ग्रहाची युती होणार आहे. त्यातून जो सकारात्मक योग्य निर्माण होईल, त्याने काही राशींच्या व्यक्तींचं नशीब पार उजळून निघण्याची शक्यता आहे. (परमजीत, प्रतिनिधी / देवघर)
advertisement
1/5
पैसाच पैसा! शुक्र-सूर्य आणणार राजयोग, 3 राशींचं नशीब पालटेल; बँक बॅलन्स वाढेल
झारखंडमधील देवघरचे ज्योतिषी नंदकिशोर मुद्गल यांनी सांगितलं की, जवळपास 10 वर्षांनी 19 मे रोजी वृषभ राशीत सूर्य आणि शुक्राची युती होणार आहे. या युतीतून शुक्र आदित्य राजयोग निर्माण होईल. हा राजयोग राशींसाठी अत्यंत शुभ मानला जातो. त्यातच सूर्याला ग्रहांचा राजा आणि शुक्राला धन, वैभव, सुख, समृद्धीचा कारक म्हटलं जातं. त्यामुळे या ग्रहांची युती आता कोणासाठी लाभदायी ठरणार पाहूया.
advertisement
2/5
वृषभ : आपल्यासाठी शुक्र आदित्य राजयोग अत्यंत शुभ ठरणार आहे. कारण याच राशीत शुक्र आणि सूर्याची युती होईल. नवदाम्पत्याला गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. करियरमध्ये प्रगती होईल. आर्थिक स्थिती भक्कम होण्याचीही शक्यता आहे. कोणतंही काम सुरळीत पार पडेल, भाग्याची पुरेपूर साथ मिळेल.
advertisement
3/5
कर्क : आपल्यालासुद्धा सूर्य आणि शुक्राच्या युतीचा प्रचंड लाभ होईल. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल, घरात शुभ कार्य पार पडण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल, त्यामुळे मन प्रसन्न राहील. मानसिक तणाव दूर होईल. आरोग्य उत्तम साथ देईल. कामकाजात नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
तूळ : विवाहासाठी इच्छूक असलेल्या व्यक्तींना आता एक उत्तम स्थळ येईल. उत्पन्न वाढेल. खर्च कमी आणि बचत जास्त होईल. शत्रूंवर मात कराल. व्यवसायात चांगला नफा मिळेल.
advertisement
5/5
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
पैसाच पैसा! शुक्र-सूर्य आणणार राजयोग, 3 राशींचं नशीब पालटेल; बँक बॅलन्स वाढेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल