Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला कौंडण्यपुरला जाताय? आवश्य पाहा ही 5 मंदिर, PHOTOS
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीच्या निमित्ताने जर कौंडण्यपुरला जायचं असेल तर त्याठिकाणी असलेल्या सर्वच मंदिरात तुम्ही दर्शनासाठी जाऊ शकता. त्याठिकाणी असलेली सर्व मंदिर ही एकमेकांपासून 1 ते 2 किमी अंतरावर आहे.
advertisement
1/7

अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर हे रुक्मिणी मातेचं माहेर आहे. त्यालाच विदर्भातील प्रति पंढरपूर म्हणून देखील ओळखले जाते. वर्धा नदीच्या काठी असलेल्या या गावात अनेक सुंदर आणि आकर्षक मंदिरे आहेत.
advertisement
2/7
आषाढी एकादशीच्या निमित्ताने जर कौंडण्यपूरला जायचं असेल तर त्याठिकाणी असलेल्या सर्वच मंदिरांत तुम्ही दर्शनासाठी जाऊ शकता. त्याठिकाणी असलेली सर्व मंदिरे ही एकमेकांपासून 1 ते 2 किमी अंतरावर आहेत. ती मंदिरे नेमकी कोणती? त्याबाबत माहिती जाणून घेऊ.
advertisement
3/7
1. विठ्ठल रुक्मिणी मंदिर कौंडण्यपूर येथील वर्धा नदीच्या काठावर असलेले हे मंदिर आहे. रुक्मिणी मातेची पालखी पंढरपूरला घेऊन जाण्याची प्रथा सुरू करणारे सदाराम महाराज यांची समाधी देखील याच मंदिरात आहे. त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणीची आकर्षक अशी मूर्ती असलेले हे मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात देखील अनेक मंदिरे आहेत. मुख्य म्हणजे याच मंदिरात विठ्ठल रुक्मिणीची जुनी खंडित झालेली मूर्ती देखील आपल्याला बघायला मिळते. या मंदिरात प्रवेश करताच पंढरपूरला आल्यासारखे भक्तांना वाटते. म्हणून याला प्रति पंढरपूर म्हटले जाते.
advertisement
4/7
2. पंचमुखी महादेव मंदिर आणि भुयार विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या डाव्या बाजूला पंचमुखी शिवलिंग आणि भुयार आहे. ते भुयार आता बंद करण्यात आले आहे. मात्र शिवलिंग अजूनही त्याठिकाणी आहे. हे शिवलिंग अतिशय पुरातन असल्याचे सांगितले जाते. सदाराम महाराजांनी या शिवलिंगाची स्थापना केल्याचा तेथील इतिहास आहे. पण पंचमुखी शिवलिंग आता दुर्मिळ आहे. त्याच मंदिरात प्राचीन गणपतीची मूर्ती देखील आपल्याला बघायला मिळते. त्याच परिसरात सत्यनारायण भगवान मंदिरे, हनुमान मंदिरे त्या परिसरात असलेले दिसून येते.
advertisement
5/7
3. अच्युत महाराज तपोभूमी विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिसरातच अच्युत महाराज तपोभूमी सुद्धा आहे. याठिकाणी अच्युत महाराज यांनी अनेक वर्ष कार्य केले. त्याठिकाणी त्यांनी शिवमंदिरे देखील उभारले आहेत. याठिकाणी असलेले शिव मंदिर हे भुयारात आहे. त्या भुयारात जाण्यासाठी पायऱ्या दिलेल्या आहेत. भुयारात जाताना आपल्याला काळोख दिसतो. मात्र, प्रवेश करताना तो काळोख आपोआप कमी होत जातो. त्याच भुयारात शिवलिंगाचे दर्शन आपल्याला मिळते.
advertisement
6/7
4. अंबिका देवी मंदिर अंबिका देवी मंदिर हे विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून 1 किमी अंतरावर आहे. याच मंदिरातून भगवान श्रीकृष्ण यांनी माता रुक्मिणीचे हरण केले होते. ती हरण खिडकी सुद्धा त्याठिकाणी आहे. भुयारी मार्ग देखील त्याठिकाणी होता, तो आता काही कारणास्तव बंद करण्यात आलेला आहे. तेथून सुरू झालेला तो भुयारी मार्ग थेट अमरावतीपर्यंत असल्याचे सांगितले जाते. या मंदिरात अंबिका देवीची प्रचंड अशी मूर्ती आहे. मंदिराच्या आवारात गोरक्षण सुद्धा आहे.
advertisement
7/7
5. श्रीकृष्ण मंदिर अंबिका देवी मंदिराच्या 500 मीटर अंतरावर श्रीकृष्ण मंदिर आहे. या मंदिरात प्रवेश करताच वृंदावनात आल्यासारखे वाटते. तेथील आकर्षक देखावा बघून मन रमून जाते. श्रीकृष्ण भगवान नृत्य करतानाची मूर्ती या मंदिरात बघायला मिळते. या मंदिरात महाप्रसादाची देखील व्यवस्था केलेली असते. सर्व भक्तांना याठिकाणी महाप्रसादाचा लाभ दिला जातो. त्याचबरोबर या मंदिराच्या आवारात एक ग्रंथालय आहे. त्याठिकाणी जाऊन तुम्ही तुम्हाला पाहिजे असलेला कोणताही ग्रंथ खरेदी करू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/Temples/
Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला कौंडण्यपुरला जाताय? आवश्य पाहा ही 5 मंदिर, PHOTOS