TRENDING:

वनवासात इथंच होतं भगवान रामाचं वास्तव्य, नाशिकमधील 5 प्रसिद्ध ठिकाणं माहितीये का?

Last Updated:
Nashik Temple: भगवान श्रीराम पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह वनवासात नाशिकमधील पंचवटी परिसरात वास्तव्यास होते. याच परिसरातील प्रभू श्रीरामांशी संबंधित 5 ठिकाणांबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/7
वनवासात इथंच होतं भगवान रामाचं वास्तव्य, नाशिकमधील 5 प्रसिद्ध ठिकाणं माहितीये का
हिंदू धर्मियांचं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून नाशिकची ओळख आहे. पौराणिक कथेनुसार, माता कैकयीच्या आग्रहावरून भगवान रामांना 14 वर्षांसाठी वनवासात पाठवण्यात आले. तेव्हा भगवान राम, पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण पंचवटीत राहत होते. पंचवटी येथील काळाराम मंदिर, सिता गुफा, तपोवन, रामकुंड यासंबंधी सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
2/7
पंचवटी: नाशिक येथे अनेक धार्मिक मंदिरे आहेत. नाशिक शहरात पंचवटी परिसर हा गोदावरी नदीच्या डाव्या तिरावर आहे. काळाराम मंदीराजवळ वटवृक्षांचा समूह आहे. पाच वटवृक्षांपासून तयार झाल्याने या परिसरास 'पंचवटी' असे म्हटले जाते. 'पंच' म्हणजे पाच व 'वटी' म्हणजे वडाचे झाड असा अर्थ होतो.
advertisement
3/7
श्री काळाराम मंदिर: नाशिक क्षेत्रातील श्री काळाराम मंदिर हे प्रमुख मंदिर मानले जाते. प्रभू रामचंद्र वनवासात असताना पंचवटीत आल्यानंतर त्यांनी येथे वास केल्याचे सांगितले जाते. या मंदिराचे बांधकाम 12 वर्षे चालले हाते. हे मंदिर रामसेज येथील काळ्या दगडांचे बांधले असून अतिशय सुंदर व कलात्मक असे आहे.
advertisement
4/7
रामकुंड: रामकुंड हे नाशिक येथे गोदावरी नदीपात्रात असून पंचवटीतील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. श्रीरामाचे वडील श्री दशरथ यांच्या नश्वर अस्थींना बुडविल्यानंतर भगवान रामाने या भागातील पाण्यात स्नान केल्याची सांगितले जाते. वनवासादरम्यानही या ठिकाणी राम स्नान करीत होते, अशी मान्यता असल्याने यास पवित्र समजले जाते. या कुंडा जवळच ‘अस्थिविलय तीर्थ’ आहे.
advertisement
5/7
तपोवन : प्रभू रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पंचवटीतील तपोवन परिसरात सर्व धर्म मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेते. प्रभू श्री राम, लक्ष्मण आणि सीता यांनी 14 वर्षांच्या वनवासातील बराचसा काळ या तपोवनात गोदातिरी व्यतीत केला. त्यांच्या जीवनात घडलेल्या काही प्रसंगांचे दर्शन राम दरबारच्या माध्यमातून या सर्व धर्म मंदिरात होते.
advertisement
6/7
सीता गुफा: नाशिक येथील एक विशेष प्रेक्षणीय स्थळ म्हणजे सीता गुंफा. नाशिकच्या पंचवटी परिसरात काळाराम मंदिराच्या बाजूला अगदी काही अंतरावर ही प्राचीन सीता गुंफा आहे. या ठिकाणी पाच महाकाय शेकडो वर्षांची जुनी वडाची झाडे आहेत. असे म्हटले जाते की, याच वडाच्या झाडाखाली सीतेचा संसार होता आणि बाजूला प्राचीन गुफा आहे. गुफा पूर्णतः दगडात कोरलेली आहे. फक्त एकच व्यक्ती एकावेळी या ठिकाणी आत प्रवेश करू शकतो. 7 -8 फूट खाली जाऊन पुढे गेल्यानंतर श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांचं प्रतिकात्मक दर्शन होतं.
advertisement
7/7
दरम्यान, नाशिकमधील पंचवटी परिसरात वनवासातील भगवान रामाचं वास्तव्य होतं. त्यामुळे नाशिकला पश्चिम भारताची काशी मानलं जातं. काळाराम मंदिर, रामकुंड, तपोवन, सीता गुफा अशी अनेक प्रसिद्ध स्थळे पंचवटी व सभोवतालच्या परिसरामध्ये गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवर आहेत. त्यामुळे इथं भाविकांची आणि पर्यटकांची गर्दी असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/Temples/
वनवासात इथंच होतं भगवान रामाचं वास्तव्य, नाशिकमधील 5 प्रसिद्ध ठिकाणं माहितीये का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल