पंचमुखी गणेशाचं एकमेव मंदिर; मोहक मूर्तीचं पाहा काय आहे वैशिष्ट्य
- Published by:News18 Marathi
Last Updated:
अनोख्या रूपातील गणेशमूर्ती असणारे कोल्हापुरात असे हे एकमेव मंदिर आहे.
advertisement
1/7

सध्या सर्वत्र गणेशोत्सावाची लगबग सुरू झालेली आहे. <a href="https://news18marathi.com/tag/kolhapur-news/">कोल्हापुरात</a> एका प्रसिद्ध अशा शाहुपुरी कुंभार गल्लीतच श्री पंचमुखी गणेशाचे एक मंदिर आहे.
advertisement
2/7
पाच मुख असणारी आणि दहा हातांची अशी बैठी स्वरुपा तील गणेशमूर्ती या मंदिरात आहे. अशा प्रकारची ही अनोख्या रूपातील गणेशमूर्ती असणारे कोल्हापुरात असे हे एकमेव मंदिर आहे. 1995 साली या पंमुखी हे गणेश मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे हे मंदिर आत्ताच्या काळातील असून यावर्षी मंदिराला 28 वर्षे पूर्ण होत आहेत.
advertisement
3/7
गणेशाच्या उपासना विविध रुपात केल्या जातात. त्यातील दशभुजा गणपतीचे स्वरूप हे ब्रम्हांडाचा कर्ता / अधिष्ठाता म्हणजेच ज्या शून्य तत्वातून ब्रम्हांडाची निर्मिती झाली, त्या ब्रम्हांडाचे प्रतीक म्हणून ज्या गणेशाची पूजा केली जाते. त्या गणेशाला दशभुजा गणेश म्हटले जाते, अशी माहिती मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी दिली आहे.
advertisement
4/7
या मंदिराचा प्रशस्त सभा मंडप आहे. या सभामंडपात उंदीर आणि कासव आहे. तर आतमध्ये गाभाऱ्यात गणेशाची सुंदर मूर्ती आहे. गाभारा आणि सभा मंडप यांच्यामध्ये काच लावण्यात आली आहे. मूळ मुर्तीच्याच खाली उत्सव मूर्ती ठेवण्यात आली आहे.
advertisement
5/7
गणेशमूर्तीला असणारी पाच मुखं ही पंचतत्व आणि पंचकोश यांचे प्रतीक आहेत, तर मूर्तीच्या दहा भुजा अर्थात हात हे गणरायाच्या दशदिशांवर असलेल्या आधिपत्याचे प्रतिनिधित्व करतात, अशा आशयाचा बोर्ड मंदिराच्या बाहेर लावण्यात आला आहे.
advertisement
6/7
मूर्तीच्या दहा भुजांमधील उजव्या खालच्या हातात चक्र सदृश्य आयुध, बाण, स्वत:चा अर्धा दात, तलवार आणि परसु ही आयुधे आहेत. तर डाव्या वरच्या हातात त्रिशूल, ढाल, शंख, धनुष्य आणि सर्वात खालचा हात हा वरद मुद्रेत आहे.
advertisement
7/7
गणेश जयंती, गणेशोत्सव या काळात हजारो भाविक आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे हे पंचमुखी दशभुजा असलेले निराळे रूप डोळ्यात साठवण्यासाठी या ठिकाणी एकत्र येत असतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/Temples/
पंचमुखी गणेशाचं एकमेव मंदिर; मोहक मूर्तीचं पाहा काय आहे वैशिष्ट्य