TRENDING:

Ram Navami: काळाराम मंदिरात रामजन्मोत्सवाचा उत्साह, पाहा पूजेचे खास PHOTO

Last Updated:
Ram Navami: अयोध्येनंतर नाशिकमधील काळाराम मंदिरात राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रामनवमीनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
advertisement
1/7
Ram Navami: काळाराम मंदिरात रामजन्मोत्सवाचा उत्साह, पाहा पूजेचे खास PHOTO
चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचांगानुसार अत्यंत महत्त्वाचा असून या तिथीला भगवान विष्णूचा सातवा अवतार मानले जाणाऱ्या ‘प्रभू रामचंद्र’ यांचा जन्म झाला. या दिवसालाच रामनवमी असे म्हटले जाते आणि संपूर्ण भारतभरात राम जन्मोत्सव साजरा केला जातो.
advertisement
2/7
ज्याप्रमाणे श्रीकृष्णाचा जन्मोत्सव रात्री 12 वाजता झाला असे मानतात. तसेच प्रभू रामाचा जन्म हा सूर्य डोक्यावर असताना दुपारी 12 वाजता झाल्याचे सांगितले जाते.
advertisement
3/7
अयोध्येनंतर नाशिकमधील काळाराम मंदिरात राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मंदिराला आकर्षक सजावट आणि रोषणाई केली जाते.
advertisement
4/7
नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात रामनवमीच्या निमित्ताने पहाटेपासूनच विविध पूजा विधी केले जातात. पहाटेपासूनच मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले असून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.
advertisement
5/7
काळाराम मंदिरात गुढीपाडव्यापासून चैत्रोत्सव सुरू आहे. या काळात हिंदू धर्मपद्धतीने श्रीरामाची पूजा केली जाते.
advertisement
6/7
श्रीरामासह माता सीता आणि लक्ष्मण यांनाही अभिषेक केला जातो. तसेच पारंपरिक वस्त्र परिधान करून आभूषणे चढवली जातात.
advertisement
7/7
काळाराम मंदिर पहाटेपासूनच भाविकांना दर्शनासाठी खुले असते. रामनवमीला शहरातील विविध भागांतून वर्षानुवर्षांची परंपरा जपत राम दिंड्या येतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/Temples/
Ram Navami: काळाराम मंदिरात रामजन्मोत्सवाचा उत्साह, पाहा पूजेचे खास PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल