TRENDING:

Astrology: करंगळीच्या बाजूच्या नाही, 'या' बोटात घालायची असते सोन्याची अंगठी!

Last Updated:
ज्योतिषशास्त्र सांगतं की, रत्न आणि अंगठी व्यक्तीचं पूर्ण आयुष्य पालटू शकते. आपल्याला अंगठी वापरण्याची हौस असेल तर कायम आपल्या कुंडलीतील ग्रह-ताऱ्यांची स्थिती पाहूनच वापरावी. (शुभम मरमट, प्रतिनिधी / उज्जैन)
advertisement
1/7
Astrology: करंगळीच्या बाजूच्या नाही, 'या' बोटात घालायची असते सोन्याची अंगठी!
अनेकजण सोन्याचीच अंगठी वापरतात. विशेषत: लग्नात वधू-वर एकमेकांना सोन्याची अंगठी भेट म्हणून देतात. सोनं हा अत्यंत पवित्र धातू आहे, यात काहीच शंका नाही परंतु जर आपल्या कुंडलीशी सोनं जुळत नाही, तर आधी कधीच पाहिल्या नसतील एवढ्या अडचणींचा सामना आपल्याला करावा लागू शकतो.
advertisement
2/7
ज्योतिषशास्त्रानुसार, अंगठ्याशेजारी असलेल्या पहिल्या बोटात म्हणजेच तर्जनीमध्ये सोन्याची अंगठी घातल्यास आयुष्यात सुख-समृद्धी येते. मुळातच सोनं हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्यात ते पहिल्या बोटात घालणं अत्यंत शुभ असतं.
advertisement
3/7
मधल्या बोटात लोखंडाची अंगठी घालण्याचा सल्ला दिला जातो. या बोटात चुकूनही सोन्याची अंगठी घालू नये. नाहीतर आपल्या आयुष्यातली नकारात्मकता वाढते.
advertisement
4/7
मधल्या बोटाच्या आणि करंगळीच्या मधलं बोट म्हणजेच अनामिकमध्ये तांब्याची अंगठी घालण्याचा सल्ला दिला जातो. या बोटाचा संबंध सूर्याशी असतो आणि सूर्याचा संबंध तांबे धातूशी असतो. म्हणूनच या बोटात तांब्याची अंगठी घातल्यास आपल्यासाठी ते अत्यंत लाभदायक ठरतं.
advertisement
5/7
करंगळीत कधीही चांदीची अंगठी घालावी. त्यामुळे आपल्याला भरभरून फायदा मिळतो. विशेषतः रागावर नियंत्रण मिळतं आणि वैवाहिक जीवनात सुख येतं.
advertisement
6/7
आपलं आयुष्य ताण-तणावाने ग्रस्त असेल तर अंगठ्यात चांदी किंवा प्लॅटिनमची <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/akshaya-tritiya-special-story-10-or-11-when-to-celebrate-it-l18w-mhij-1177857.html">अंगठी</a> घालण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे आयुष्यातल्या सर्व <a href="https://news18marathi.com/religion/snake-dreams-are-scary-but-not-always-negative-know-the-astrology-behind-this-mhij-1177819.html">अडचणी</a> हळूहळू कमी होतात.
advertisement
7/7
(सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Astrology: करंगळीच्या बाजूच्या नाही, 'या' बोटात घालायची असते सोन्याची अंगठी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल