TRENDING:

सकाळी उठताच तुम्हीही करताय 'या' 5 चुका? 100 टक्के होणार नुकसान, टिकणार नाही पैसा

Last Updated:
हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार, आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते, यावर आपला संपूर्ण दिवस आणि घरातील भरभराट अवलंबून असते. अनेकदा आपण नकळत सकाळी अशा काही चुका करतो, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि आर्थिक चणचण भासू लागते.
advertisement
1/7

2/7
जर तुम्हाला वाटत असेल की खूप कष्ट करूनही पैसा टिकत नाहीये, तर सकाळी उठल्या उठल्या तुम्ही 'या' 5 गोष्टी तर करत नाही ना? हे तपासून पाहा. जाणून घ्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याने घरात नकारात्मकता जाणवते.
advertisement
3/7
उठल्याबरोबर आरसा पाहणे: अनेक लोकांना झोपेतून उठल्याबरोबर आरसा पाहण्याची सवय असते. वास्तूशास्त्रानुसार, सकाळी आपल्या शरीरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त असतो, जो चेहऱ्यावर दिसतो. आरसा पाहिल्याने ती नकारात्मकता पुन्हा आपल्यात प्रवेश करते, ज्यामुळे दिवसभर चिडचिड आणि कामात अडथळे येतात.
advertisement
4/7
उष्टी किंवा घाणेरडी भांडी पाहणे: रात्रीची उष्टी भांडी तशीच ठेवणे आणि सकाळी उठल्यावर ती पाहणे हा मोठा वास्तुदोष मानला जातो. यामुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि घरात दरिद्रता येते. नेहमी रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ करूनच झोपावे.
advertisement
5/7
सकाळीच वादावादी किंवा राग व्यक्त करणे: सकाळची वेळ ही देवाच्या स्मरणाची असते. जर तुम्ही दिवसाची सुरुवात भांडणाने किंवा ओरडून केली, तर तुमच्या घरात नकारात्मकतेचा वास राहतो. यामुळे मानसिक तणाव वाढतो आणि प्रगतीचे मार्ग रोखले जातात.
advertisement
6/7
उशिरा उठणे आणि आळस करणे: सूर्योदयानंतर खूप उशिरापर्यंत झोपून राहणे हे दारिद्र्याचे लक्षण मानले जाते. जो व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठतो, त्याच्यावर ग्रहांची विशेष कृपा राहते. आळस हा भाग्याचा शत्रू आहे, त्यामुळे सकाळी लवकर उठून कामाला लागणे समृद्धीसाठी आवश्यक आहे.
advertisement
7/7
बंद पडलेले घड्याळ पाहणे: सकाळी उठल्या उठल्या जर तुमची नजर बंद पडलेल्या घड्याळावर पडली, तर तुमचा संपूर्ण दिवस खराब जाऊ शकतो. बंद घड्याळ हे थांबलेल्या वेळेचे किंवा 'वाईट काळाचे' प्रतीक आहे. यामुळे घरात प्रगती थांबते आणि आर्थिक नुकसान होते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
सकाळी उठताच तुम्हीही करताय 'या' 5 चुका? 100 टक्के होणार नुकसान, टिकणार नाही पैसा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल