TRENDING:

काय सांगता! 'हे' छोटे इशारे देतात मोठ्या बदलांचे संकेत, शुभं असतात 'या' गोष्टी; घरात आणतात सुख-समृद्धी

Last Updated:
वास्तुशास्त्रानुसार, आपल्या आयुष्यात काहीही चांगले किंवा वाईट घडण्यापूर्वी निसर्ग आपल्याला काही विशिष्ट संकेत देत असतो. अनेकदा आपण या छोट्या बदलांकडे दुर्लक्ष करतो, पण हे संकेत भविष्यात येणाऱ्या 'सुख, समृद्धी आणि प्रगतीचे' दूत असू शकतात.
advertisement
1/7
काय सांगता! 'हे' छोटे इशारे देतात मोठ्या बदलांचे संकेत, शुभं असतात 'या' गोष्टी
वास्तुशास्त्रानुसार, आपल्या आयुष्यात काहीही चांगले किंवा वाईट घडण्यापूर्वी निसर्ग आपल्याला काही विशिष्ट संकेत देत असतो. अनेकदा आपण या छोट्या बदलांकडे दुर्लक्ष करतो, पण हे संकेत भविष्यात येणाऱ्या 'सुख, समृद्धी आणि प्रगतीचे' दूत असू शकतात. जर तुमच्यासोबत किंवा घरामध्ये खालील घटना घडत असतील, तर समजून जा की तुमचे नशीब सोन्यासारखे चमकणार आहे आणि घरात लक्ष्मीचे आगमन होणार आहे.
advertisement
2/7
दारात गाईचे आगमन: वास्तुशास्त्रानुसार, गाय ही पूजनीय असून तिच्यात 33 कोटी देवांचा वास असतो. जर सकाळी कामाला निघताना तुम्हाला गाय दिसली किंवा तुमच्या घराच्या दारात येऊन गाईने हंबरडा फोडला, तर तो अत्यंत शुभ संकेत आहे. याचा अर्थ तुमच्या आयुष्यातील संकटे संपणार असून लवकरच मोठा धनलाभ होणार आहे.
advertisement
3/7
पक्षांनी घरटे बांधणे: जर तुमच्या घराच्या बाल्कनीत किंवा खिडकीत एखाद्या पक्षाने घरटे बांधले असेल, तर ते शुभ मानले जाते. पक्षी फक्त अशाच ठिकाणी घरटे बांधतात जिथे सकारात्मक ऊर्जा असते. हे भविष्यात येणाऱ्या आनंदाची आणि कुटुंबातील वाढीची खूण आहे.
advertisement
4/7
घरात काळ्या मुंग्यांचा समूह: अनेकदा घरात मुंग्या निघाल्यास आपण कंटाळतो. मात्र, जर अचानक तुमच्या घरात काळ्या मुंग्या समूहाने खाण्याचे पदार्थ गोळा करताना दिसल्या, तर तो ऐश्वर्य प्राप्तीचा संकेत आहे. हे सूचित करते की तुमच्या घरातील आर्थिक अडथळे दूर होऊन संपत्तीत वाढ होणार आहे.
advertisement
5/7
रस्त्यात पैसे सापडणे: घराबाहेर पडल्यानंतर किंवा प्रवासात जर तुम्हाला अचानक वाटेत पैसे सापडले, तर ते भाग्योदयाचे लक्षण आहे. याचा अर्थ असा की नशीब तुमची साथ देणार आहे आणि रखडलेली कामे आता वेगाने पूर्ण होतील.
advertisement
6/7
स्वप्नात पांढऱ्या वस्तू दिसणे: जर तुम्हाला स्वप्नात पांढरा हत्ती, पांढरा साप, कमळाचे फूल किंवा पांढरा घोडा दिसला, तर शास्त्रानुसार हा राजयोगाचा संकेत आहे. अशा स्वप्नांनंतर व्यक्तीला समाजात मान-सन्मान मिळतो आणि मोठ्या पदाची प्राप्ती होऊ शकते.
advertisement
7/7
तुळशीचे रोप हिरवेगार होणे: ज्या घरात तुळशीचे रोप अचानक खूप बहरते आणि हिरवेगार होते, तिथे साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो. जर सुकत चाललेली तुळस पुन्हा टवटवीत झाली, तर समजा की तुमच्या घरावरील वाईट काळ संपला असून आनंदाची बातमी लवकरच मिळणार आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
काय सांगता! 'हे' छोटे इशारे देतात मोठ्या बदलांचे संकेत, शुभं असतात 'या' गोष्टी; घरात आणतात सुख-समृद्धी
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल