TRENDING:

डोळा फडफडण, हाताला खाज सुटणं, कसला असतो इशारा? कारणं वाचून तुमचीही झोप उडेल

Last Updated:
आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा डोळा फडफडणे किंवा हाताला खाज सुटणे अशा घटना घडतात. आपण अनेकदा याकडे शारीरिक हालचाल म्हणून दुर्लक्ष करतो, परंतु भारतीय सामुद्रिक शास्त्रानुसार या घटना भविष्यात घडणाऱ्या शुभ-अशुभ घटनांचे संकेत देतात.
advertisement
1/7
डोळा फडफडण, हाताला खाज सुटणं, कसला असतो इशारा? कारणं वाचून तुमचीही झोप उडेल
आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा डोळा फडफडणे किंवा हाताला खाज सुटणे अशा घटना घडतात. आपण अनेकदा याकडे शारीरिक हालचाल म्हणून दुर्लक्ष करतो, परंतु भारतीय सामुद्रिक शास्त्रानुसार या घटना भविष्यात घडणाऱ्या शुभ-अशुभ घटनांचे संकेत देतात. विशेषतः डोळा आणि हाताची खाज यांचा संबंध आर्थिक स्थिती आणि भेटीगाठींशी जोडला जातो.
advertisement
2/7
उजव्या हाताला खाज सुटणे: पुरुषांच्या बाबतीत उजव्या हाताला खाज येणे धनलाभाचे संकेत मानले जाते. याउलट, महिलांच्या बाबतीत हे खर्चाचे किंवा आर्थिक नुकसानीचे लक्षण मानले जाते.
advertisement
3/7
डाव्या हाताला खाज सुटणे: महिलांसाठी डाव्या हाताला खाज येणे अत्यंत शुभ असते, हे लक्ष्मी आगमनाचे लक्षण आहे. मात्र, पुरुषांसाठी हे आर्थिक हानी किंवा पैसा खर्च होण्याचे संकेत आहेत.
advertisement
4/7
पुरुष आणि महिला: पुरुषांचा उजवा डोळा फडफडणे अत्यंत शुभ मानले जाते. हे प्रगती, नोकरीत बढती किंवा धनलाभाचे संकेत आहेत. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्याची ही वेळ असू शकते. महिलांचा उजवा डोळा फडफडणे अशुभ मानले जाते. हे आगामी काळात येणाऱ्या संकटाचे किंवा वादाचे लक्षण असू शकते.
advertisement
5/7
पुरुष आणि महिला: पुरुषांसाठी डावा डोळा फडफडणे अशुभ मानले जाते. यामुळे शत्रूंशी वाद किंवा विनाकारण धावपळ वाढू शकते. महिलांचा डावा डोळा फडफडणे हे सौभाग्याचे आणि आनंदाचे प्रतीक आहे. लवकरच एखादी चांगली बातमी किंवा मनासारखी वस्तू मिळण्याचे हे संकेत आहेत.
advertisement
6/7
उजवी भुवई फडफडणे: जर तुमची उजवी भुवई सतत फडफडत असेल, तर त्याचा अर्थ असा आहे की, लवकरच तुमची एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट होणार आहे किंवा रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत.
advertisement
7/7
डावी भुवई फडफडणे: डावी भुवई फडफडणे हे कौटुंबिक आनंदाचे प्रतीक आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील आणि मुलांकडून चांगली बातमी मिळेल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
डोळा फडफडण, हाताला खाज सुटणं, कसला असतो इशारा? कारणं वाचून तुमचीही झोप उडेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल