दुर्दैवी इतकं की...
रुद्राप्पा लांडगे यांची शेती रावळगुंडवाडी हद्दीतील पाच्छापूर रस्त्याला आहे. शेतामध्ये सध्या रब्बी हंगामाची कामे सुरू असून पाहुण्यांच्या ट्रॅक्टरने रुद्राप्पा यांच्या शेतामध्ये नांगरणी सुरू होती. गेल्या 75 वर्षांपासून कित्येक दुष्काळ जगलेले आणि कष्टाच्या घामाने माती ओली करत शेतीशी इमान राखणारे आजोबा या वयात देखील कणखरपणे मातीशी जोडून होते. यंदाच्या पिक-पाण्यासाठी सुद्धा ते नांगरणी करत असलेल्या ट्रॅक्टर शेजारी उभे राहून अनुभवाचे सल्ले देत नांगरणी करून घेत होते.
advertisement
लेकीचं भयानक कांड, आई थेट पोलिसांत, श्रुतीनं इसराईल सोबत..., सोलापुरातील घटनेनं खळबळ
नेमकं झालं असं
चालक ट्रॅक्टर मागे घेत असताना अचानकपणे तोल गेला आणि ते मागे पडले. परिणामी ट्रॅक्टरचे चाक रुद्राप्पांच्या पायावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्यांना जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र अतिशय गंभीर दुखापत आणि अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याप्रकरणी जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. मात्र ज्या शेतामध्ये आयुष्यभर घाम गाळला त्याच शेतात दुर्दैवी घटनेने रक्त वाहिल्याने रुद्राप्पा यांच्या मृत्यूने संपूर्ण परिसर हळहळत आहे.






