बॉयफ्रेंडसमोर दुसऱ्याला मिठी मारली, किस केलं आणि सगळं संपलं! सेलिब्रिटी कपलचं ब्रेकअप
- Published by:Minal Gurav
Last Updated:
ब़लिवूडच्या सगळ्यात फेमस कपलचं ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली आहे. बॉयफ्रेंडसमोर दुसऱ्या पुरुषाला मिठी मारणं आणि किस करणं अभिनेत्रीला महागात पडलंय, असं म्हटलं जात आहे.
advertisement
1/7

बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रेटी कपल्स आहेत. पण त्यांच्यात कधी काय बिनसेल काही सांगता येत नाही. काही दिवसांआधी अभिनेत्री तारा सुतारिया आणि वीरा पाहाडिया यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यात एका कॉन्सर्टमध्ये तारा सुतारिया सिंगर एपी ढिल्लनला किस करताना दिसली होती.
advertisement
2/7
समोर बॉयफ्रेंड वीर पाहाडिया उभा असताना ताराने लाखो लोकांसमोर सिंगर मिठी मारली आणि किस केलं. हे पाहून वीरच्या चेहऱ्यावरच रंग उडाला. त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. प्रचंड जेलसी त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होती.
advertisement
3/7
दरम्यान वीर आणि तारा यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. वीर पाहाडिया आणि तारा सुतारिया यांचं ब्रेकअप झाल्याची माहिती समोर येत आहे. बॉयफ्रेंडसमोर सिंगरला किस करणं ताराला महागात पडल्याचं बोललं जात आहे.
advertisement
4/7
अभिनेत्री तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांच्या ब्रेकअपच्या चर्चा होत असताना ताराने ज्या सिंगरला किस केलं होतं तो गायिका एपी ढिल्लन सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. 25 डिसेंबर 2025ला एपी ढिल्लनच्या मुंबई कॉन्सर्टमध्ये घडलेला प्रकार तारा आणि वीरच्या ब्रेकअपचं कारण ठरल्याचं बोललं जात आहे.
advertisement
5/7
खरं तर, तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांच्या नात्यामुळे अनेक वेळा एकत्र दिसले तेव्हा ते चर्चेत आले. 2026 च्या सुरुवातीला तारा आणि वीरच्या ब्रेकअपची माहिती समोर येताच चाहत्यांनी एपी ढिल्लच्या कॉन्सर्टशी याचा संबंध लावला आहे.
advertisement
6/7
अनेक युझर्सनी असा दावा केला आहे की, कॉन्सर्टनंतर दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढला आणि दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. चूक कोणाची होती? असा प्रश्नही अनेकांनी विचारला आहे.
advertisement
7/7
दरम्यान तारा आणि वीर यांनी ब्रेकअपच्या चर्चांवर अद्याप मौन बाळगलं आहे. ताराचा आगामी 'टॉक्सिक' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बॉयफ्रेंडसमोर दुसऱ्याला मिठी मारली, किस केलं आणि सगळं संपलं! सेलिब्रिटी कपलचं ब्रेकअप