TRENDING:

रोहितच्या मित्राने सर्वांची बोलती बंद केली, एकाच वेळी झाला दोन संघांचा हेड कोच!

Last Updated:
सध्या महिला प्रीमियर लीगसाठी लिलाव सुरु असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. महिला प्रीमियर लीगच्या UP Warriors या संघाचा हेड कोच बदलण्यात आला असून हेड कोच पदी रोहित शर्माच्या मित्राची निवड करण्यात आली आहे.
advertisement
1/7
रोहितच्या मित्राने सर्वांची बोलती बंद केली, एकाच वेळी झाला दोन संघांचा हेड कोच!
सध्या महिला प्रीमियर लीगसाठी लिलाव सुरु असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. महिला प्रीमियर लीगच्या UP Warriorz या संघाचा हेड कोच बदलण्यात आला असून हेड कोच पदी रोहित शर्माच्या मित्राची निवड करण्यात आली आहे.
advertisement
2/7
या आधी यूपी वॉरियर्स या संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका जॉन लेविस हे भूषवत होते आता या ठिकाणी बीसीसीआयने हकालपट्टी केलेल्या कोचला संधी मिळाली आहे.
advertisement
3/7
यूपी वॉरियर्सच्या हेड कोचपदी नियुक्त झालेला दुसरा तिसरा कोणी नसून अभिषेक नायर आहेत. या आधी त्यांनी टीम इंडियासाठीही प्रशिक्षकाची भूमिका निभावली आहे.
advertisement
4/7
बीजीटी मालिका गमावल्यानंतर बीसीसीआयने एक आढावा बैठक घेतली होती, ज्यामध्ये संघ व्यवस्थापनातील एका सदस्याने ड्रेसिंग रूमच्या बातम्या बाहेर जात असल्याची तक्रार केली होती. या बैठकीनंतर टीम इंडियाचा सहायक प्रशिक्षक असलेल्या अभिषेक नायर याला या पदावरून काढून टाकण्यात आले होते.
advertisement
5/7
यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने अभिषेक नायर याला आयपीएलमध्ये हेड कोच म्हणून नियुक्त केले. नायर याने चंद्रकांत पंडित यांची जागा घेतली आहे, ज्यांनी आयपीएल 2025 हंगामानंतर संघासोबतची साथ संपवली होती.
advertisement
6/7
आता नायर यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी मिळाली आहे. या जबाबदारीने नायर प्रचंड खुश झाले आहेत. टीम इंडिया सोडताच अभिषेक नायर त्यांच्या जुन्या आयपीएल संघ केकेआरमध्ये सामील झाला होता. यानंतर आता अभिषेक नायरने महिला प्रीमियर लीगमध्ये मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली आहे.त्यामुळे ते आता यूपी वॉरियर्सला प्रशिक्षण देताना दिसणार आहे.
advertisement
7/7
यूपी वॉरियर्सने अभिषेक नायर यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे अभिषेक नायर महिला प्रीमियर लीग फ्रँचायझी यूपी वॉरियर्समध्ये सामील झाला आहे. तो संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
रोहितच्या मित्राने सर्वांची बोलती बंद केली, एकाच वेळी झाला दोन संघांचा हेड कोच!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल