Who is Tanveer Sangha : वडील टॅक्सीचालक, भारताशी खास कनेक्शन...ऑस्ट्रेलियाने मैदानात उतरवलेला 'तो' ट्रम्पकार्ड कोण?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
चॅम्पियन्स ट्रॉफीत आज बलाढ्य ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया यांच्यात पहिला सेमी फायनल सामना सूरू आहे. या सामन्यात सामन्यात ऑस्ट्रेलियाने दोन बदल केले आहेत.
advertisement
1/6

ऑस्ट्रेलियाने कूपर कॉनोलीच्या जागी मॅथ्यू शॉर्ट आणि स्पेन्सर जॉन्सनच्या जागी तनवीर संघाचा स्थान दिले आहे. दरम्यान स्मिथच्या घोषणेनंतर तन्वीर संघा इंस्टाग्रामवर ट्रेंड करू लागला आणि सोशल मीडियावर त्याची चर्चा सूरू आहे.
advertisement
2/6
२३ वर्षीय तन्वीर हा लेग-स्पिनर आहे. तन्वीर संघाचे भारताशी एक विशेष नाते आहे. तन्वीरचे वडील जोगा संघा हे जालंधरपासून 20 किमी अंतरावर असलेल्या रहिमपूर गावातील रहिवासी आहेत.
advertisement
3/6
1997 मध्ये ते कामाच्या शोधात ऑस्ट्रेलियाला गेले होते.जोगा सिडनीमध्ये टॅक्सी चालवतात.तन्वीरचा जन्म सिडनीमध्येच झाला आहे.
advertisement
4/6
जोगा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, माझ्या कुटुंबात कोणालाही क्रिकेटची आवड नव्हती.मला कबड्डी आणि व्हॉलीबॉल खेळायला खूप आवडायचे.जेव्हा तन्वीर १० वर्षांचा होता, व्हा मी त्याला एका क्रिकेट क्लबमध्ये दाखल केले. मी दररोज माझ्या टॅक्सीने तन्वीरला क्लबमध्ये सोडत असे.
advertisement
5/6
तन्वीर संघा २०२३ च्या क्रिकेट विश्वचषकात कांगारू संघाचाही भाग होता. आतापर्यंत त्याने ऑस्ट्रेलियासाठी ३ एकदिवसीय सामन्यांमध्ये 2 आणि ७ टी-२० सामन्यांमध्ये 10 विकेट घेतल्या आहेत.
advertisement
6/6
तन्वीरने ऑगस्ट २०२३ मध्ये डर्बन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले आणि त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये पॉचेफस्ट्रूम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० सामन्यात पदार्पण केले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Who is Tanveer Sangha : वडील टॅक्सीचालक, भारताशी खास कनेक्शन...ऑस्ट्रेलियाने मैदानात उतरवलेला 'तो' ट्रम्पकार्ड कोण?