TRENDING:

मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं गणित बिघडलं, दिल्लीच्या विजयाने घोळ झाला,वाचा समीकरण

Last Updated:
अशात आज दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. मुंबईन दिल्लीसमोर 155 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा दिल्लीने यश्स्वीपणे पाठलाग करून हा सामना 7 विकेट राखून जिंकला आहे
advertisement
1/7
मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं गणित बिघडलं, दिल्लीच्या विजयाने घोळ झाला,वाचा समीकरण
डब्ल्युपीएलच्या यंदाच्या हंगामात रॉयल चँलेंजर्स बंगळुरू प्लेऑफमध्ये पोहोचणारी पहिली टीम ठरली आहे. त्यानंतर आता दुसरी टीम कोण ठरते आहे, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहेत.
advertisement
2/7
अशात आज दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. मुंबईन दिल्लीसमोर 155 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा दिल्लीने यश्स्वीपणे पाठलाग करून हा सामना 7 विकेट राखून जिंकला आहे
advertisement
3/7
दिल्ली कॅपिटल्सकडून शेफाली वर्मा आणि लिझेलीने चांगली सुरूवात केली होती. शेफाली वर्मा 29 धावांवर तर लीझेली ली 46 धावांवर बाद झाली होता.त्यानंतर जेमीमाने 51 धावांनी नाबाद खेळी करून सामना जिंकून दिला होता.
advertisement
4/7
प्रथम फलंदाजी करताना मुंबईची सूरुवात चांगली झाली नव्हती. कारण दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले होते. त्यानंतर नॅट सिव्हस ब्रंटने सर्वाधिक 65 धावांची खेळी केली होती. तर हरमनप्रीत कौरने 41 धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावर मुंबईने 154 धावा केल्या होत्या.
advertisement
5/7
दिल्ली कॅपिटल्सकडून श्री चरणीने 3 तर नंदनी शर्मा आणि मेरीजन कापने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
advertisement
6/7
दरम्यान दिल्लीने मुंबईचा पराभव केल्यानंतर त्यांच प्लेऑफ समीकरण पु्र्णपणे बदललं आहे. मुंबईकडे आता सहा सामन्यांमध्ये फक्त 4 गुण आहेत. आता मुंबईकडे फक्त 2 सामने उरले आहेत. हे सामने त्यांना काही करून जिंकावे लागणार आहेत. जर मुंबईने सामने जिंकले तर त्यांना प्लेऑफ गाठता येणार नाही.
advertisement
7/7
दिल्ली कॅपिटल्सचे आता पाच सामन्यामध्ये 4 गुण झाले आहेत. त्यानंतर आता दिल्लीकडे फक्त तीन सामने उरले आहेत. हे तीन सामने जिंकून दिल्लीला प्लेऑफमध्ये पोहोचता येणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं गणित बिघडलं, दिल्लीच्या विजयाने घोळ झाला,वाचा समीकरण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल