TRENDING:

T20 World Cupच्या सेमी फायनलला पोहोचली पहिली टीम, शेवटच्या मिनिटात दोन चुकांमुळे पाकिस्तानने घालवली मॅच

Last Updated:
पाकिस्तानने दिलेल्या 164 धावांचा इंग्लंडने 2 विकेट राखून यशस्वी पाठलाग करून हा सामना जिंकला आहे. इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार हॅरी ब्रुक ठरला आहे.कारण त्याने 100 धावांची खेळी केली आहे.
advertisement
1/7
T20 World Cupच्या सेमी फायनलला पोहोचली पहिली टीम, शेवटच्या मिनिटात दोन चुकांमुळे
टी20 वर्ल्ड कपमध्ये आज इंग्लडने पाकिस्तानचा 2 विकेट राखून पराभव केला आहे. या पराभवानंतर पाकिस्तानची टीम वर्ल्ड कपमधून जवळपास बाहेर होण्याच्या मार्गावर आहे.
advertisement
2/7
पाकिस्तानने दिलेल्या 164 धावांचा इंग्लंडने 2 विकेट राखून यशस्वी पाठलाग करून हा सामना जिंकला आहे. इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार हॅरी ब्रुक ठरला आहे.कारण त्याने 100 धावांची खेळी केली आहे.
advertisement
3/7
इंग्लंडच्या या विजयानंतर ती सेमी फायनलला पोहोचणारी पहिली टीम ठरली आहे. कारण इंग्लंडने सुपर 8 मधल्या दोनही सामने जिंकले आहेत.
advertisement
4/7
इंग्लंडने पहिल्यांदा श्रीलंकेचा 51 धावांनी पराभव केला होता,त्यानंतर आता इंग्लंडने आज पाकिस्तानवर 2 विकेट राखून विजय मिळवला आहे. या विजयानंतर इंग्लंड सेमी फायनला पोहोचली आहे.
advertisement
5/7
पाकिस्तानच्या पराभवाच्या कारणांबद्दल बोलायच झालं तर हा सामना पाकिस्तानकडे जिंकण्याची संधी होती. विशेष म्हणजे हॅरी ब्रुकच्या शतकानंतर पाकिस्तान सामना जिंकू शकली असती पण शेवटच्या क्षणी केलल्या दोन चुकांमुळे मॅच हातातून गेली.
advertisement
6/7
19 व्या ओव्हरला मोहम्मद नवाजने दोन विकेट काढल्या होत्या. त्यामुळे इंग्लंड चांगलीच दबावात आली होती. त्यानंतर शेवटच्या बॉलवर नवाज आपल्याच गोलंदाजीवर खराब फिल्डींग केल्याने जोफ्राला एक धाव काढता आली. ही पाकिस्तानची मोठी चूक ठरली.
advertisement
7/7
त्यानंतर 20 व्या ओव्हरला पाकिस्तान सैम अयुबच्या रूपात एका स्पिनरला गोलंदाजी देऊ शकला असता पण पाकिस्तानने ते न करता सलमान मिर्झाला गोलंदाजी देऊन मोठी चूक केली. आणि जोफ्राने चार धावा काढून मॅच जिंकवली.स्पिनर्स असता तर त्याला कदाचित खेळताना अडचणी आल्या असत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cupच्या सेमी फायनलला पोहोचली पहिली टीम, शेवटच्या मिनिटात दोन चुकांमुळे पाकिस्तानने घालवली मॅच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल