Team India : आगरकर-गंभीरमुळे करिअर संकटात, टीम इंडियाच्या 5 दिग्गजांनी 15 दिवसात गेम पलटवला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टीम इंडिया सध्या संक्रमणाच्या काळातून जात आहे, त्यामुळे अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या करिअरबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे, पण भारताच्या 5 क्रिकेटपटूंनी मागच्या 15 दिवसांमध्ये सगळ्यांची बोलती बंद केली आहे.
advertisement
1/9

मागच्या काही काळापासून टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर क्रिकेट चाहत्यांच्या रडारवर आहेत, कारण भारतीय क्रिकेटमध्ये मागच्या 6 महिन्यांमध्ये कमालीचे बदल झाले आहेत.
advertisement
2/9
इंग्लंड दौऱ्याआधी रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजआधी रोहित शर्माची कॅप्टन्सी काढून घेण्यात आली. तेव्हापासूनच विराट आणि रोहितच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं.
advertisement
3/9
रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याच्या करिअरवर प्रश्न विचारणाऱ्यांना बॅटने प्रत्युत्तर दिलं. दुसऱ्या वनडेमध्ये अर्धशतक केल्यानंतर रोहितने तिसऱ्या वनडेमध्ये नाबाद शतक झळकवून भारताला विजय मिळवून दिला.
advertisement
4/9
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात विराट कोहली शून्य रनवर आऊट झाला, पण तिसऱ्या वनडेमध्ये विराटने धमाकेदार कमबॅक केलं. विराटने सिडनीमध्ये झालेल्या या सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळी केली.
advertisement
5/9
मागच्या काही काळापासून टीम इंडिया बाहेर असलेल्या मोहम्मद शमीचे निवड समिती प्रमुख अजित आगरकरसोबत वाद सुरू आहेत. पण आता शमीने त्याच्या बॉलिंगनेच उत्तर दिलं आहे. रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या शमीने पहिल्या दोन सामन्यांमध्येच 15 विकेट घेतल्या आहेत.
advertisement
6/9
इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमधून करुण नायरने भारतीय टीममध्ये 8 वर्षांनी कमबॅक केलं, पण त्याला फार यश मिळालं नाही. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजमधून नायरला टीमबाहेर केलं गेलं. आता करुण नायरने रणजी ट्रॉफीमध्ये गोव्याविरुद्ध नाबाद 174 रनची खेळी केली.
advertisement
7/9
गोव्याविरुद्धच्या शतकानंतर करुण नायरने निवड समितीवर निशाणा साधला. मागच्या 2 वर्षांमधल्या माझ्या कामगिरीनंतर मला आणखी संधी दिली गेली पाहिजे होती, असं करुण नायर म्हणाला. आम्ही इंग्लंडमध्ये करुण कडून जास्त अपेक्षा केली होती, पण त्याने फक्त एक अर्धशतक केलं, असं अजित आगरकर म्हणाला होता.
advertisement
8/9
रणजी ट्रॉफीमध्ये अजिंक्य रहाणेनेही शतकी खेळी केली आहे. मुंबईकडून खेळताना रहाणेने छत्तीसगडविरुद्ध 159 रनची खेळी केली. अजिंक्य रहाणेही मागच्या बऱ्याच काळापासून टीम इंडियातून बाहेर आहे. रणजी ट्रॉफीमधल्या शतकानंतर रहाणेनेही निवड समितीवर निशाणा साधला.
advertisement
9/9
ऑस्ट्रेलियामध्ये टीमला माझी गरज होती, पण त्यांनी माझ्यासोबत कोणताही संवाद साधला नाही. मला संधी मिळायला हवी होती, असं अजिंक्य रहाणे म्हणाला आहे. टीममध्ये तरुण खेळाडू गरजेचे आहेत, पण अनुभवासोबतच टीम चांगली कामगिरी करते, असं वक्तव्य रहाणेने केलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : आगरकर-गंभीरमुळे करिअर संकटात, टीम इंडियाच्या 5 दिग्गजांनी 15 दिवसात गेम पलटवला!