Rashmika-Vijay : विजय देवरकोंडासोबतच्या साखरपुड्यावर अखेर रश्मिका मंदानाने दिली कबुली, कधी होणार लग्न?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Rashmika Mandanna-Vijay Deverakonda engagement : काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदानाने विजय देवरकोंडासोबत गुपचूप साखरपुडा उरकल्याचे मानले होते. आता स्वतः रश्मिका मंदानानेही या बातमीवर मोहर लावली आहे.
advertisement
1/9

मुंबई: साऊथ चित्रपटसृष्टीनंतर आता बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे जबरदस्त चर्चेत आहे.
advertisement
2/9
नुकताच 'छावा' नंतर तिचा दिवाळीत प्रदर्शित झालेला चित्रपट 'थामा' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे, पण याच दरम्यान तिच्या आणि साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा यांच्या साखरपुड्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली.
advertisement
3/9
काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदानाच्या हातात डायमंड रिंग दिसल्यानंतर चाहत्यांनी तिने विजय देवरकोंडासोबत गुपचूप साखरपुडा उरकल्याचे मानले होते. आता स्वतः रश्मिका मंदानानेही या बातमीवर मोहर लावली आहे.
advertisement
4/9
'तेलुगु ३६०' च्या एका बातमीनुसार, जेव्हा रश्मिका तिच्या 'थामा' चित्रपटाचे प्रमोशन करत होती, तेव्हा तिला विजय देवरकोंडा आणि तिच्या कथित साखरपुड्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
advertisement
5/9
यावर रश्मिकाने फार काही न बोलता केवळ एका वाक्यात उत्तर दिले. ती म्हणाली, "याबद्दल आता प्रत्येकाला माहित आहे!" तिच्या या उत्तराने तिने साखरपुड्याच्या बातम्यांना अप्रत्यक्षपणे दुजोराच दिला आहे.
advertisement
6/9
रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांच्यातील नात्याची चर्चा यापूर्वीही झाली होती. 'द गर्लफ्रेंड' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी निर्माता अल्लू अरविंदनेही रश्मिकाला विजयचे नाव घेऊन छेडले होते. अल्लू अरविंद यांनी जाहीरपणे म्हटले होते, "तो (विजय) प्री-रिलीज इव्हेंटसाठी येत आहे," हे ऐकून रश्मिकाला तिचे हसू आवरता आले नव्हते.
advertisement
7/9
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे टॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. त्यांनी 'गीता गोविंदम' आणि 'डियर कॉमरेड' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
advertisement
8/9
रिपोर्टनुसार, साखरपुडा झाल्यावर आता हे दोघे पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे. हे लग्न एक प्रायव्हेट सेरेमनी असणार आहे, ज्यात फक्त त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीयच उपस्थित राहतील.
advertisement
9/9
यापूर्वी २०१७ मध्ये रश्मिकाचा अभिनेता रक्षित शेट्टी याच्यासोबत साखरपुडा झाला होता, पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि नंतर दोघांनी परस्पर संमतीने तो साखरपुडा मोडला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rashmika-Vijay : विजय देवरकोंडासोबतच्या साखरपुड्यावर अखेर रश्मिका मंदानाने दिली कबुली, कधी होणार लग्न?