IPL 2025 : रोहित, विराट ते धोनी यांच्यासह कोणी गाजवले IPLचे सर्व हंगाम? जाणून घ्या एका क्लिकवर
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
IPL 2025 : आयपीएलचा 18 वा हंगाम येत्या 22 मार्चपासून सुरु होत आहे. या आयपीएलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी आयपीएल पर्वणी आहे.
advertisement
1/7

मनीष पांडे यानं विराट कोहली सोबत क्रिकेट कारकीर्द सुरु केली. आयपीएलच्या पहिल्या हंगामात मनीष पांडे मुंबई इंडियन्सकडे होता. 2009 मध्ये तो आरसीबीकडून खेळत होता. आयपीएलमध्ये पहिलं शतक करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे, सध्या तो केकेआरमध्ये आहे.
advertisement
2/7
रिद्धीमान साहानं देखील आयपीएलच्या सर्व हंगामात सहभाग घेतला. तो सुरुवातीला केकेआरकडून खेळत होता. त्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायजर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्सकडून तो खेळला आहे. त्यानं देखील आता निवृत्ती घेतलीय.
advertisement
3/7
दिनेश कार्तिकनं देखील 2008 पासून सर्व आयपीएलमध्ये सहभाग घेतला आहे. केकेआरचं कर्णधारपद देखील त्याच्याकडे होते. गेल्या वर्षी म्हणजेच 17 व्या हंगामात तो आरसीबीकडून खेळत होता. आयपीएलमधून त्यानं निवृत्ती घेतली आहे.
advertisement
4/7
शिखर धवन 2008 पासून आयपीएल खेळत होता. पहिल्या आयपीएलमध्ये शिखर धवन दिल्ली डेअरडेविल्सच्या संघात होता.नंतरच्या काळात तो मुंबई इंडियन्स, डेक्कन चार्जर्स, सनरायजर्स हैदराबादमध्येदेखील होता. 17 व्या आयपीएलमध्ये तो पंजाबचा कॅप्टन होता. दुखापतीमुळं तो फार सामने खेळला नाही. शिखर धवननं देखील आयपीएलमधून निवृत्ती घेतलीय.
advertisement
5/7
रोहित शर्मानं आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यानं मुंबईला 5 वेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे. डेक्कन चार्जर्सनं देखील एकदा विजेतेपद मिळवलं आहे.
advertisement
6/7
विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे, जो गेल्या 17 वर्षांपासून एकाच टीम सोबत आहे. 2008 पासून विराट कोहली आरसीबीकडून खेळतोय.
advertisement
7/7
महेंद्रसिंह धोनीनं देखील सर्व आयपीएल खेळली आहेत. चेन्नई सुपर किंग्जवर बंद होती तेव्हा धोनी पुणे सुपरजाएंटसकडून 2016 आणि 2017 मध्ये खेळेला होता. धोनीनं चेन्नईला अनेकदा विजेतेपद मिळवून दिलंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2025 : रोहित, विराट ते धोनी यांच्यासह कोणी गाजवले IPLचे सर्व हंगाम? जाणून घ्या एका क्लिकवर