IND vs AUS T20 : 3 जागांसाठी दोघांमध्ये रेस, आशिया कप जिंकवणाऱ्यालाच गंभीर डच्चू देणार, Playing XI ची शॉकिंग अपडेट
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
IND vs AUS 1st T20 भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना बुधवारी होणार आहे. या सामन्यात टीम इंडिया आशिया कप जिंकवून देणाऱ्या खेळाडूलाच बाहेर बसवणार आहे.
advertisement
1/7

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या टी-20 सीरिजला बुधवारपासून सुरूवात होत आहे. कॅनबेरा येथील मनुका ओव्हल येथे हा सामना होणार आहे. कॅनबेरामधील खेळपट्टी ही वेगवान आणि उसळी असणारी आहे, त्यामुळे टीम इंडिया कोणत्या बॉलिंग कॉम्बिनेशनसह मैदानात उतरणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
advertisement
2/7
भारतीय टीम आशिया कपमध्ये युएईमधल्या संथ आणि कमी उसळी असलेल्या स्पिनरना अनुकूल खेळपट्टीवर खेळली. आशिया कपमध्ये भारतीय टीम 3 स्पिनर आणि एका फास्ट बॉलरसह मैदानात उतरली होती. पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध कर्णधार सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर वेगळी रणनीती अवलंबणार आहेत.
advertisement
3/7
कॅनबेराची खेळपट्टी बॅटिंगसाठी चांगली असते, जिथे बॉल वेगाने येतो तसंच उसळीही मारतो. त्यामुळे भारतीय टीमला फास्ट बॉलिंगवर अवलंबून राहावं लागणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तीन स्पिनरच्या रणनीतीपासून भारतीय टीम लांब राहिल.
advertisement
4/7
आशिया कपमध्ये भारतीय टीमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांचा समावेश होता. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात या तिघांची एकत्र खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे.
advertisement
5/7
ऑस्ट्रेलियामधील मैदानं मोठी आहेत, ज्यामुळे स्पिनरना मदत होऊ शकते. ऑलराऊंडर असल्यामुळे डावखुरा स्पिनर अक्षर पटेलचं टीममधलं स्थान निश्चित आहे.
advertisement
6/7
दुसऱ्या स्पिनरसाठी कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांच्यात लढत आहे. पण ऑस्ट्रेलियामध्ये कुलदीपची याआधीची कामगिरी चांगली आहे. कुलदीप ऑस्ट्रेलियामध्ये सर्व फॉरमॅटमध्ये खेळला आहे, तर वरुण अजून ऑस्ट्रेलियामध्ये एकही मॅच खेळलेला नाही. अनुभव आणि परिस्थिती समजून घ्यायच्या बाबतीत कुलदीप वरुणच्या पुढे आहे.
advertisement
7/7
मिस्ट्री स्पिनर असलेला वरुण चक्रवर्ती हा सहसा संथ आणि सपाट खेळपट्टीवर बॉलिंग करतो. खेळपट्टी मदत करत नसेल तर वरुण चक्रवर्तीवर विरोधी टीमचे बॅटर आक्रमण करू शकतात. दुसरीकडे कुलदीप डावखुरा चायनामन बॉलर असल्यामुळे त्याचे बॉल समजायला कठीण जातात, तसंच त्याचा बॉल उसळीही घेतो. त्यामुळे मनुका ओव्हलमध्ये वरुणऐवजी कुलदीपला संधी मिळण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs AUS T20 : 3 जागांसाठी दोघांमध्ये रेस, आशिया कप जिंकवणाऱ्यालाच गंभीर डच्चू देणार, Playing XI ची शॉकिंग अपडेट