TRENDING:

IND vs AUS : 3 मॅचमध्ये फक्त 43 रन, टीम इंडियाच्या स्टारवर कुणाची कृपा? पहिल्या टी-20 मध्ये डच्चू मिळणार!

Last Updated:
IND vs AUS 1st T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वनडे सीरिजनंतर आता टी-20 सीरिजला 29 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. भारताच्या वनडे टीममध्ये असलेले अनेक क्रिकेटपटू टी-20 टीममध्येही आहेत.
advertisement
1/6
3 मॅचमध्ये फक्त 43 रन, भारताच्या स्टारवर कुणाची कृपा? पहिल्या टी-20 तून डच्चू!
वनडे सीरिजनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या टी-20 सीरिजला 29 ऑक्टोबरला सुरूवात होईल. वनडे सीरिज खेळलेले काही खेळाडू टी-20 टीममध्येही आहेत, त्यामुळे वनडेमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल.
advertisement
2/6
भारतीय टीमने टी-20 सीरिजसाठी सराव सुरू केला असला, तरी स्टार क्रिकेटपटूचा फॉर्म टीमसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. शुभमन गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिन्ही वनडेमध्ये ओपनिंगला बॅटिंग केली, पण 3 इनिंगमध्ये त्याला फक्त 10, 9 आणि 24 रन करता आल्या. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात केलेल्या एकूण 43 रन या भारताच्या टॉप-6 बॅटरमधल्या सर्वात कमी रन आहेत.
advertisement
3/6
गिलला आशिया कपमध्येही मोठा स्कोअर करता आला नाही. 21 सप्टेंबरला सुपर-4 च्या सामन्यात गिलने 28 बॉलमध्ये 47 रनची खेळी केली. याशिवाय त्याला आशिया कपमध्ये लक्षणीय खेळी करता आली नाही.
advertisement
4/6
गिलचा सध्याचा बॅटिंग फॉर्म पाहता त्याला बुधवारच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते. तर त्याच्याऐवजी संजू सॅमसनला ओपनर म्हणून खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
5/6
संजू सॅमसन हा भारताचा टी-20 फॉरमॅटमधला पहिल्या पसंतीचा विकेट कीपर बॅटर आहे. मागच्या वर्षी संजूने ओपनर म्हणून 3 शतके झळकावली होती, यातली दोन दक्षिण आफ्रिकेत होती. संजूने ओपनर म्हणून चांगली कामगिरी केली आहे, पण गिलचं टीममध्ये कमबॅक झाल्यामुळे संजूला मिडल ऑर्डरमध्ये ऍडजस्ट करावं लागलं.
advertisement
6/6
संजू आशिया कपमध्ये मधल्या फळीत खेळला, पण त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. या परिस्थितीमध्ये गिलला काही दिवस विश्रांती देण्याचा निर्णय दिला जाऊ शकतो, पण टीम मॅनेजमेंट उपकर्णधार असलेल्या गिलला विश्रांती द्यायचा कठोर निर्णय घेणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs AUS : 3 मॅचमध्ये फक्त 43 रन, टीम इंडियाच्या स्टारवर कुणाची कृपा? पहिल्या टी-20 मध्ये डच्चू मिळणार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल