दिवाळी पार्टीमध्ये दिसली पतीची EX पत्नी, संतापलेल्या रवीना टंडनने तिच्यावर फेकला ज्यूसचा ग्लास, नेमकं घडलं तरी काय?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood controversy : हा वाद तिचे पती अनिल थडानी यांची पहिली पत्नी नताशा सिप्पी हिच्यासोबत एका पार्टीत झाला होता, जिथे रवीनाने नताशावर थेट ज्यूस फेकला होता.
advertisement
1/7

मुंबई: ९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री रवीना टंडन तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. चित्रपटांव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यातील एका जुन्या हाय-व्होल्टेज वादाने ती आजही चर्चेत असते. हा वाद तिचे पती अनिल थडानी यांची पहिली पत्नी नताशा सिप्पी हिच्यासोबत एका पार्टीत झाला होता, जिथे रवीनाने नताशावर थेट ज्यूस फेकला होता.
advertisement
2/7
अनिल थडानी आणि रवीना टंडन यांचा विवाह २००४ मध्ये झाला. अनिल यांनी त्यांची पहिली पत्नी नताशा सिप्पीला घटस्फोट दिला होता. लग्नानंतर काही काळानंतर दिग्दर्शक रितेश सिधवानीच्या एका मोठ्या दिवाळी पार्टीत अनिल, रवीना आणि नताशा समोरासमोर आले.
advertisement
3/7
सूत्रांनुसार, नताशा सतत अनिल थडानी यांच्याजवळ येऊन त्यांच्याशी बोलण्याचा आणि जाणीवपूर्वक संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. रवीनाला नताशाचे हे वागणे अजिबात आवडले नाही आणि तिला खूप राग आला. एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत रवीनाने स्पष्ट केले होते की, नताशाने वारंवार अनिलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यामुळे ती नाराज होती.
advertisement
4/7
जेव्हा परिस्थिती बिघडली, तेव्हा रागावर नियंत्रण न ठेवता रवीनाने जवळ असलेला ज्यूसचा ग्लास उचलला आणि नताशा सिप्पीच्या दिशेने फेकला.
advertisement
5/7
बॉलिवूडमधील बड्या व्यक्तींच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्यामुळे नंतर इंडस्ट्रीत त्याची खूप चर्चा झाली. एका मुलाखतीत रवीना टंडनला या घटनेबद्दल विचारले असता, तिने आपल्या कृतीचे जोरदार समर्थन केले आणि पश्चात्ताप नसल्याचे ठामपणे सांगितले.
advertisement
6/7
रवीना म्हणाली, "त्या पार्टीत मी जे केले, त्याबद्दल मला अजिबात पश्चात्ताप नाही. देव आणि माझ्या वडिलांनंतर माझ्या आयुष्यात माझा पती सर्वात महत्त्वाचा आहे. कोणीही त्याच्यावर वाईट आरोप केलेले किंवा टीका केलेले मी सहन करणार नाही."
advertisement
7/7
ती पुढे म्हणाली, "जर कोणी माझ्या पतीबद्दल वाईट बोलत असेल, तर तो माझाही अपमान आहे. माझ्या कुटुंबाचा अपमान करण्याचा हक्क कोणालाही नाही." या वक्तव्यावरून रवीना तिच्या पती आणि कुटुंबाच्या बाबतीत किती प्रोटेक्टिव्ह आहे, हे स्पष्ट झाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
दिवाळी पार्टीमध्ये दिसली पतीची EX पत्नी, संतापलेल्या रवीना टंडनने तिच्यावर फेकला ज्यूसचा ग्लास, नेमकं घडलं तरी काय?