TRENDING:

IND vs AUS : टीम इंडियातून 6 खेळाडू बाहेर, T20 सीरिजसाठी संघात मोठे बदल, कुणाला मिळाली संधी?

Last Updated:
भारताच्या वनडे टीममधील 7 खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 टी-20 मॅचची सीरिजही खेळणार आहेत. वनडे सीरिजमध्ये पराभव झाल्यानंतर आता हे खेळाडू टी-20 सीरिजमध्ये वेगळा निकाल लावण्यासाठी मैदानात उतरतील.
advertisement
1/10
टीम इंडियातून 6 खेळाडू बाहेर, T20 सीरिजसाठी संघात मोठे बदल, कुणाला मिळाली संधी?
3 वनडे मॅचच्या सीरिजनंतर टीम इंडिया आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. सीरिजचा पहिला सामना 29 ऑक्टोबरला कॅनबेरामध्ये होणार आहे. तर पुढचे 4 सामने 31 ऑक्टोबर, 2 नोव्हेंबर, 6 नोव्हेंबर आणि 8 नोव्हेंबरला होतील.
advertisement
2/10
भारताच्या वनडे टीममधले 7 खेळाडू टी-20 सीरिजमध्येही खेळणार आहेत, जे सीरिज जिंकण्यासाठी मैदानात उतरतील. मागच्या महिन्यात आशिया कपमध्ये भारताला विजय मिळवून देणारा सूर्यकुमार यादव टीमचा कर्णधार आहे. तर वनडे टीमचा कर्णधार शुभमन गिल हा टी-20 टीमचा उपकर्णधार असेल.
advertisement
3/10
दुखापतीमुळे मैदानाबाहेर असलेला हार्दिक पांड्या वगळता आशिया कपमध्ये खेळलेले उरलेले 14 खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी निवडण्यात आले आहेत. हार्दिक पांड्याची जागा नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदरने घेतली आहे. हे दोघेही वनडे सीरिजमध्ये खेळले होते.
advertisement
4/10
वनडे सीरिजच्या तीनही मॅचमध्ये खेळलेले श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि मोहम्मद सिराज भारताच्या टी-20 टीमचा भाग नाहीत.
advertisement
5/10
सिडनीमधल्या तिसऱ्या वनडेमध्ये खेळलेला प्रसिद्ध कृष्णा, यशस्वी जयस्वाल आणि ध्रुव जुरेल हेदेखील भारतात परतणार आहेत. तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आधीच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे.
advertisement
6/10
सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, जितेश शर्मा, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन आणि रिंकू सिंग या 9 खेळाडूंची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी निवड झाली आहे.
advertisement
7/10
सूर्यकुमार यादव या टीमचा कर्णधार आहे, तर संजू सॅमसन टीमचा पहिल्या पसंतीचा विकेटकीपर-बॅटर असेल. भारताच्या महान बॉलरपैकी एक असलेला जसप्रीत बुमराह बॉलिंग आक्रमणाचं नेतृत्व करेल. तर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधला नंबर वन बॅटर अभिषेक शर्मा टीम इंडियाच्या बॅटिंगची सुरूवात करेल.
advertisement
8/10
शुभमन गिल, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षीत राणा आणि वॉशिंगटन सुंदर हे 7 खेळाडू वनडे सीरिजनंतर टी-20 सीरिजमध्येही खेळतील.
advertisement
9/10
भारताची वनडे टीम : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल
advertisement
10/10
भारताची टी-20 टीम : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, रिंकू सिंग
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs AUS : टीम इंडियातून 6 खेळाडू बाहेर, T20 सीरिजसाठी संघात मोठे बदल, कुणाला मिळाली संधी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल