IND vs NZ : LIVE सामन्यात अंपायरकडून मोठी चूक घडली, विकेटमागून राहुल ओरडत धावत आला, नेमकं काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
इंदुरच्या होळकर स्टेडिअमवर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई करून 8 विकेट गमावून 337 धावा ठोकल्या आहेत.
advertisement
1/7

इंदुरच्या होळकर स्टेडिअमवर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई करून 8 विकेट गमावून 337 धावा ठोकल्या आहेत.
advertisement
2/7
न्यूझीलंडकडून डेरी मिचेलने 137 धावांची शतकीय खेळी केली आहे. या खेळीत त्याने 3 षटकार आणि 15 चौकार लगावले होते. त्याच्यासोबत ग्लेन फिलिप्सने 106 धावांची शतकीय खेळी केली. या खेळी दरम्यान 3 षटकार आणि 9 चौकार मारले होते.
advertisement
3/7
या दोन्ही खेळाडूंच्या बळावर न्यूझीलंडने 8 विकेट गमावून 337 धावा केल्या आहेत.आता टीम इंडिया हे लक्ष्य गाठून सामना जिंकेल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
advertisement
4/7
या सामन्या दरम्यान अंपायरकडून मोठी चूक घडली आहे. अर्शदिपच्या 44 व्या ओव्हर दरम्यान ही चूक घडली होती. राहुलने या घटनेत मध्यस्थी केल्यानंतर या चुकीत दुरूस्ती करण्यात आली.
advertisement
5/7
त्याचं झालं असं की अर्शदिपने टाकलेला चौथा बॉल हा डेरी मिचेलच्या बॅटीला न लागता विकेटमागे चौकार गेला. त्यामुळे अंपायरने लेगबायचा इशारा दिला होता.
advertisement
6/7
अंपायरने लेगबाय दिलेला पाहून केएल राहुल भडकला त्याने अंपायरला लगेचच बॅटीला बॉल लागल्याची माहिती दिली.त्यानंतर अंपायरने आपली चुक दुरूस्त केली होती.
advertisement
7/7
दरम्यान या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर 337 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. हे लक्ष्य पुर्ण करून आता टीम इंडिया मालिका जिंकते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : LIVE सामन्यात अंपायरकडून मोठी चूक घडली, विकेटमागून राहुल ओरडत धावत आला, नेमकं काय घडलं?