IND vs SA Final : वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाला छप्परफाड बक्षीस, पैशांचा नुसता पाऊस पडणार, किती रक्कम मिळणार?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कप 2025 चा फायनल सामना उद्या रविवारी 2 नोव्हेंबर 2025 ला रंगणार आहे. नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडिअमवर हा सामना दुपारी 3 वाजता खेळवला जाणार आहे.
advertisement
1/7

आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कप 2025 चा फायनल सामना उद्या रविवारी 2 नोव्हेंबर 2025 ला रंगणार आहे. नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडिअमवर हा सामना दुपारी 3 वाजता खेळवला जाणार आहे.
advertisement
2/7
हा फायनल सामना जिंकणाऱ्या विजेत्या संघाला तब्बल 4.48 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 40 कोटी) मिळतील. ही रक्कम ऑस्ट्रेलियाच्या 2022 च्या बक्षीस रकमेपेक्षा 239 टक्के जास्त आहे.
advertisement
3/7
उपविजेत्या संघाला 2.24 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 20 कोटी) मिळतील. ही रक्कम इंग्लंडच्या 2022 च्या बक्षीस रकमेपेक्षा 273 टक्के जास्त आहे.
advertisement
4/7
उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांना 1.12 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 9.3 कोटी) इतकी समान रक्कम मिळाली.
advertisement
5/7
गुणतालिकेत पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असलेल्या संघांना (श्रीलंका आणि न्यूझीलंड) 700,000 डॉलर्स (अंदाजे 5.8कोटी) इतकी समान रक्कम मिळाली.
advertisement
6/7
सातव्या आणि आठव्या क्रमांकावर असलेल्या संघांना (बांगलादेश आणि पाकिस्तान) 280,000 डॉलर्स (अंदाजे 2.3 कोटी) मिळाले.
advertisement
7/7
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक संघाला 250,000 डॉलर्स (अंदाजे 2 कोटी) ची स्वतंत्र हमी दिली जात आहे. शिवाय, गट टप्प्यात जिंकणाऱ्या प्रत्येक सामन्यासाठी संघांना 34,314 डॉलर्स (अंदाजे 2.8 दशलक्ष) मिळतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA Final : वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाला छप्परफाड बक्षीस, पैशांचा नुसता पाऊस पडणार, किती रक्कम मिळणार?