नशीब आगरकर ऑस्ट्रेलियाचा...नाही तर स्टार्कवर आली असती शमीसारखी वेळ,व्हायरल पोस्टने खळबळ
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
शमी आज वयाच्या पस्तीशीत देशांतर्गत क्रिकेट खेळतो,तर मिचेल स्टार्क देखील त्याच वयात असताना अॅशेस मालिका गाजवतो आहे.
advertisement
1/7

अॅशेस टेस्ट मालिकेतील दुसऱ्या टेस्ट सामन्याला आजपासून सूरूवात झाली आहे.या सामन्याच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने 6 विकेट घेऊन विकेटसचा षटकार उडवला होता.
advertisement
2/7
दरम्यान अॅशेस मालिकेतील मिचेल स्टार्कची गोलंदाजी पाहून आज अनेक भारतीय फॅन्सना मोहम्मद शमी आठवला होता.कारण शमी भारतासाठी अशीच कामगिरी करायचा.
advertisement
3/7
पण शमी आज वयाच्या पस्तीशीत देशांतर्गत क्रिकेट खेळतो,तर मिचेल स्टार्क देखील त्याच वयात असताना अॅशेस मालिका गाजवतो आहे.
advertisement
4/7
त्यामुळे ही गोष्ट अनेक फॅन्सना खटकली होती.त्यामुळे राजीव नावाच्या एक्स युझरने नशीब अजित आगरकर ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचा अध्यक्ष नाही आहे, नाहीतर मिचेस स्टार्कला घरात बसून अॅशेस मालिक पाहावी लागली असती असे चाहत्याने लिहले आहे.
advertisement
5/7
दोन्ही खेळाडूंच वय सारखंच आहे.पण टीम इंडियात शमीची अवस्था खूपच बिकट आहे. तो सातत्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये कामगिरी करतो आहे,पण त्याला अद्याप टीम इंडियात संधी मिळाली नाही आहे.
advertisement
6/7
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत मोहम्मद शमीने आज 3.2 ओव्हर गोलंदाजी केली. या दरम्यान त्याने 13 धावा देऊन 4 विकेट काढल्या होत्या. त्यामुळे शमीच्या या गोलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांचे कंबरडं मोडलं.
advertisement
7/7
नुकत्याच सूरू झालेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मोहम्मद शमीने 4 विकेट घेतल्या होत्या. तर रणजी ट्रॉफी स्पर्धेत शमीने 4 सामन्यात 20 विकेट घेतल्या होत्या. तरी देखील त्याला संधी मिळाली नाही आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
नशीब आगरकर ऑस्ट्रेलियाचा...नाही तर स्टार्कवर आली असती शमीसारखी वेळ,व्हायरल पोस्टने खळबळ