TRENDING:

Mumbai Indians : लहानपणीच वडिलांचं निधन, कंडक्टर आईने मोठं केलं, मुंबई इंडियन्सचा हिरा वानखेडे गाजवणार!

Last Updated:
लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलं, त्यानंतर आईने बेस्ट बस कंडक्टर म्हणून काम करत मुलाला लहानाचं मोठं केलं. हाच मुलगा आता आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे.
advertisement
1/7
लहानपणीच वडिलांचं निधन, कंडक्टर आईने मोठं केलं, मुंबईचा हिरा वानखेडे गाजवणार!
आयपीएल 2026 च्या लिलावामध्ये मुंबई इंडियन्सने लोकल बॉय अथर्व अंकोलेकरला टीममध्ये घेतलं आहे. 30 लाखांच्या बेस प्राईजवर मुंबईने अथर्वला विकत घेतलं.
advertisement
2/7
भारतीय अंडर-19 टीम आणि मुंबई टी-20 लीगमध्ये अथर्व अंकोलेकरने नाव कमावलं. 2019 च्या अंडर-19 आशिया कपमध्ये अथर्व अंकोलेकर भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू होता. तसंच फायनलमध्ये अथर्व प्लेअर ऑफ द मॅच होता.
advertisement
3/7
स्थानिक क्रिकेटमध्ये अथर्व मुंबईकडून खेळतो. जानेवारी 2021 मध्ये अथर्वने मुंबईच्या सीनियर टीमकडून पदार्पण केलं. ऑलराऊंडर असलेला अथर्व हा डावखुरी बॅटिंग आणि स्पिन बॉलिंग करतो.
advertisement
4/7
मुंबई टी-20 लीगच्या इतिहासातला अथर्व अंकोलेकर सगळ्यात महागडा खेळाडू ठरला होता. अथर्वला मुंबई टी-20 लीगमध्ये 16.25 लाख रुपयांना विकत घेतलं होतं.
advertisement
5/7
अथर्वची आई बेस्टमध्ये कंडक्टर आहे. अथर्वचे वडील ट्रान्सपोर्ट विभागात काम करत होते, पण वडिलांच्या निधनानंतर अथर्वच्या आईला बेस्टमध्ये कंडक्टरची नोकरी मिळाली.
advertisement
6/7
हलाखीच्या परिस्थितीमध्ये अथर्वच्या आईने त्याला लहानाचं मोठं केलं, पण अथर्वनेही त्याची क्रिकेट खेळण्याची जिद्द सोडली नाही. मुलाला खेळता यावं यासाठी आईनेही तुटपुंज्या पगारातून अथर्वसाठी क्रिकेटचा खर्च केला.
advertisement
7/7
अथर्व अंकोलेकरच्या या संघर्षाला अखेर यश मिळालं आहे, तसंच त्याचं स्वप्नही पूर्ण झालं आहे. आयपीएल 2026 मध्ये अथर्व रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह या खेळाडूंसोबत मैदानात खेळताना दिसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Mumbai Indians : लहानपणीच वडिलांचं निधन, कंडक्टर आईने मोठं केलं, मुंबई इंडियन्सचा हिरा वानखेडे गाजवणार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल